दोन हजार फूट उंचीवरील कड्यावरून धावते रेल्वे

1889 मध्ये या रेल्वेमार्गाचे उद्घाटन झाले होते. या रेल्वेची चाके दातर्‍यांची असतात. आता या मार्गावर इलेक्ट्रिक ट्रेन धावते.

    स्वित्झर्लंडमध्ये एक रेल्वे तब्बल दोन हजार मीटर उंचीची चढण चढून तेथील तीव्र उतार आणि कड्यांवरून धावते. पिलाट्स विभागाची ही रेल्वे अल्पनाचस्ताद आणि माऊंट पिलाट्सला जोडते. पूर्वी ही रेल्वे वाफेच्या इंजिनवर धावत असे.

    या ट्रॅकची लांबी सुमारे 4.5 किलोमीटर आहे. 1889 मध्ये या रेल्वेमार्गाचे उद्घाटन झाले होते. या रेल्वेची चाके दातर्‍यांची असतात. आता या मार्गावर इलेक्ट्रिक ट्रेन धावते. सुरुवातीला या ठिकाणी ताशी 3 ते 4 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे होती. सध्याची रेल्वे केवळ अर्ध्या तासात हा पल्ला पार करते. मे ते नोव्हेंबर या काळात हा मार्ग सुरू असतो. हिवाळ्यात हिमवृष्टीने हा परिसर झाकला जातो आणि हा मार्ग बंद ठेवला जातो. हिवाळ्यात लोक केबल कारचा वापर करून माऊंट पिलाट्सवर जातात.