karjat caves view

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील पेठचा किल्ला, बौद्ध कालीन कोंढाणे लेणी, आंबिवली लेणी, प्राचीन होळकर तलाव, पुरातन मंदिरे अशा एका ना अनेक गोष्टी कर्जतच्याkarjat) वैभवात आजही भर घालत आहे.

– ज्योती जाधव 
कर्जतच्या(karjat tourist spots) वैभवात एक नाही तर अनेक मानाचे तुरे आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील पेठचा किल्ला, बौद्ध कालीन कोंढाणे लेणी, आंबिवली लेणी, प्राचीन होळकर तलाव, पुरातन मंदिरे अशा एका ना अनेक गोष्टी कर्जतच्या वैभवात आजही भर घालत आहे. भिवपुरी टाटा पॉवर सारखे वीज निर्मितीचे केंद्र, खळखळ वाहणारी पेज आणि उल्हास नदी, वामन पैं ज्ञानपीठ, श्री स्वामी समर्थांचा मठ, कपालेश्वर मंदिर, वेणगाव महालक्ष्मी मंदिर अशी पुरातन मंदिरे आहेत.

कोंढाणे लेणी
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावापासून काही अंतरावरील उंच डोंगरामध्ये बौद्धकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात. कोंढाणे लेण्यात एक चैत्यगृह, सात विहार आणि दोन गुहा आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात. अंदाजे नऊ मीटर उंचीचे चैत्यगृह येथे आहे. पिंपळपानाच्या आकारातील कमानी कोरलेल्या येथे दिसून येतात. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते. या पटातील काही नृत्यकलाकारांच्या हाती धनुष्य-बाण आदी आयुधे आहेत. विशेष म्हणजे या शिल्पांवर वस्त्रप्रावरणे, अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. दोन्ही बाजूस असलेल्या या शिल्पपटांच्या खालीच दोन्हीकडे यक्षांची भव्य शिल्पे कोरलेली असावीत. मात्र ती आता भग्नावस्थेत आहेत.

या भग्न यक्षाच्या डाव्या खांद्यावर प्राचीन ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ‘कन्हस अंतेबासिन बलकेन कतं’ या लेखाचा अर्थ असा की, ‘कन्हाचा अंतेवासी (शिष्य) बालुक याने (हे काम) केले’. कलते खांब, झुकत्या भिंती आणि खोदकामात केलेला अर्ध उठावाचा वापर येथे दिसतो. या गृहास आधार म्हणून मूळ दगडातील २८ खांब येथे कोरलेले होते. अत्यंत प्रमाणबद्ध असलेले हे अष्टकोनी खांब इतिहासात आक्रमकांच्या हल्ल्यात तोडले गेलेले दिसून येतात. चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे. गजपृष्ठाकृती छत असलेल्या या चैत्यगृहात छताला अर्धवर्तुळाकार लाकडी वासे बसवलेले आहेत. मात्र या स्तुपाचीही काहीशी तुटफूट झाली आहे .

karjat caves

१४ खोल्या उपलब्ध
या पुढची गुहा म्हणजे विहार, आपणाला ७ ते ८ दगडी पायऱ्या चालून वरती जावं लागत. या विहाराची उंची ५ फूट ८ इंच आणि १८ फूट लांबीची आहेत. विहाराच्या भिंतीमध्ये विश्राम घेण्यासाठी १४ खोल्या कोरलेल्या आहेत. प्रत्येक दरवाजा नक्षीदार कोरलेला आत एकावेळी एकाच माणूस राहील एवडीच जागा आणि विश्राम घेण्यासाठी एक चकोनी दगडाचा पलंग केलेला आहे.

भितीवरच सुंदर रेखीव नक्षीकाम त्यालाच लागून आपणाला तीसरी आणि चौथी गुहा लागते. या गुहा रिकाम्या आहेत. यामध्ये नक्षी काम केलेले नाही आहे. चौथ्या गुहेमध्ये पाणी साठलेलं दिसत. पाऊसात येथून सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा वाहतो.

विहार
विहाराच्या डाव्या भिंतीवर आपणाला एक स्तूप कोरलेलं आहे, ते सुस्थित आहे. विहाराच्या तीनही भिंतीवर सुंदर नक्षी काम केलेलं आहे. छपरावर चोकोनी आकाराचं नक्षी काम दिसते. विरहाच्या भिंती काळ्या रंगाच्या झाल्या आहेत. समोरची भिंत उध्वस्थ झाली आहे, इथून आपणाला समोरच सुंदर दृश्य बघावयास मिळते.

पेठचा किल्ला ( कोथळी गड )
कर्जतपासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या कोथळीगड उर्फ पेठ किल्ला या गडावर आजवरच्या इतिहास अभ्यासक संशोधक यांनी लिखाण केलेल्या गडाच्या इतिहासात दोन तोफांची नोंद आहे. त्यातील एक तोफ गडाच्या माचीवरील पेठ या गावात लहान उखळी तोफ आहे. तर गडावर दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दुसरी ६.५ फुट लांबीची तोफ होती, अशी नोंद मिळते. कोथळीगडाच्या इतिहासाच्या आधारे या गडाचा मराठी इंग्रजी कागदपत्रातून तसेच मुघली कागदपत्रातून एक बलाढ्य संरक्षण ठाणे होत आणि मराठ्यांचे या गडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्व आले होते पुढे पेशवे काळातही हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, तर १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून याच्या वास्तूची तोडफोड केली.

/thane-news-marathi/illegal-hukkah-bar-increasing-in-thane-nrsr-66853/”]