‘या’ गावात स्त्रियांना राहावे लागते ५ दिवस निवस्त्र; प्रथा न पाळल्यास…

ही परंपरा तेव्हा पासून सुरू झालेला आहे आणि श्रावणच्या महिन्यात पाच दिवस महिलांनी कपडे धारण करणे सोडले. घोंड पीणी गावातील लोकं ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या भादो संक्रांतीला काळा महिना देखील म्हणतात.  येथील महिला या महिन्यात पाच दिवस कपडे न घालण्या याव्यतिरिक्त..

    भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात प्रत्येक राज्यात, शहरात, गावात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाची वेगळी परंपरा, मान्यता, रितीरिवाज आणि वेगळी जीवनशैली असते. यामध्ये काही गोष्टींचा संबंध हा अंधविश्वासासोबत देखील जोडला जातो.

    काही प्रथा परंपरा इतक्या वेगळ्या आणि विचित्र असतात ज्या पाहून आपल्याला विश्वास बसत नाही की असे करण्यामागील कारण काय असू शकते. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश येथील मनिकर्ण घाटीतील पीनी गावातील ही परंपरा.

    पिनी गावात आतिशय आगळीवेगळी परंपरा आहे ती म्हणजे या गावातील महिला वर्षातून पाच दिवस कपडे धारण करत नाहीत.

    या पाच दिवसांमध्ये त्यांना पतीसोबत बोलण्याची किंवा विनोद करण्याचीदेखील परवानगी नसते. तेथील महिला ही परंपरा श्रावणच्या महिन्यात पूर्ण करतात. या महिन्यातील पाच दिवस त्या महिला निवस्त्र राहतात.

    मान्यतेनुसार ही परंपरा पूर्ण न केल्यास त्या घरांमध्ये अशुभ घटना घडायला लागतात, वाईट बातम्या मिळू लागतात. त्यामुळे त्या गावातील प्रत्येक घरातील महिलांना ही परंपरा पूर्ण करावी लागते. बदलत्या वेळेनुसार या परंपरेत देखील काही बदल करण्यात आलेले आहेत.

    आधी महिला ५ पूर्ण दिवस निवस्त्र राहायच्या मात्र हल्ली ऊन पासून तयार करण्यात आलेले बारीक पहाडी कापड त्या महिला शरीराच्या आसपास गुंडाळतात. याला पट्टू देखील म्हटले जाते.

    या मान्यते मागे एक कहाणी देखील कारणीभूत आहे. असे सांगितले जाते किंवा खूप वर्षांपूर्वी एक राक्षस तिथे राहत होता तो सुंदर कपडे परिधान करणाऱ्या महिलेला उचलून आपल्या सोबत घेऊन जायचा. या राक्षसाचा अंत लाहूआ देवाने केला होता. अशी मान्यता आहे की हे देवता आजही गावात येतात आणि तेथील भक्तांचे दुःख दूर करतात.

    ही परंपरा तेव्हा पासून सुरू झालेला आहे आणि श्रावणच्या महिन्यात पाच दिवस महिलांनी कपडे धारण करणे सोडले.

    घोंड पीणी गावातील लोकं ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या भादो संक्रांतीला काळा महिना देखील म्हणतात.  येथील महिला या महिन्यात पाच दिवस कपडे न घालण्या याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करत नाहीत. त्यांना हसण्याची देखील परवानगी नसते . या वेळेदरम्यान पतीला देखील सल्ला दिला जातो की पत्नीपासून दूर राहिले पाहिजे. या नियमांचे पालन न केल्यास घरात वाईट घटना घडतात अशी मान्यता आहे.