मिठाची किंमत आहे सोन्यापेक्षा जास्त; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

फिकट रंगाचे हे मीठ आज चार स्वादात उपलब्ध आहे. अनेक श्रीमंत घरातून आणि रेस्टोरेंटमधून या मिठाला मागणी आहे. हे मीठ गिफ्ट बॉक्स मधून गिफ्ट म्हणून सुद्धा एकमेकांना दिले जाते.

    मीठ म्हणजे अगदी स्वस्त असा समज असेल तर तो प्रथम दूर करायला हवा. जगात असेही एक प्रकारचे मीठ आहे जे खरेदी करायचे ठरविले तर सर्वसामान्य माणसाला कर्ज घ्यावे लागेल. तरीही हे महागडे मीठ अनेक प्रसिद्ध शेफची प्रथम पसंती आहे.

    आइसलँडिक सॉल्ट या नावाने ते प्रसिद्ध असून हे मीठ १ किलोसाठी ८० लाख ३० हजार रुपयांना मिळते. हे मीठ म्हणजे लग्झरी आयटम असून हे मीठ बनविणारी कंपनी काही वर्षापूर्वी स्थापन झाली आहे. मात्र येथे मीठ बनते ते २०० वर्षाच्या परंपरागत पद्धतीने. विशेष म्हणजे ही सर्व प्रोसिजर हाताने केली जाते. आइसलँडच्या उत्तर पश्चिम भागात मिठाच्या कारखान्यात ते बनते. हा कारखाना पहाडी भागात आहे. वर्षातील अनेक महिने प्रचंड हिमपातामुळे हा रस्ता बंद असायचा पण आता बोगदा तयार केला आहे. त्यामुळे १९९६ पासून येथे स्थिती बरी आहे असे सांगितले जाते.

    दरवर्षी येथे १० मेट्रिक टन मिठाचे उत्पादन होते. समुद्रातील पाणी पाईप द्वारे आणून ते प्रथम उकळावे लागते. पाणी तापविणे, उकळविणे, आणि मिठाचे क्रिस्टल तयार झाल्यावर ते वाळविणे अशी सर्व कामे हाताने केली जातात. फिकट रंगाचे हे मीठ आज चार स्वादात उपलब्ध आहे. अनेक श्रीमंत घरातून आणि रेस्टोरेंटमधून या मिठाला मागणी आहे. हे मीठ गिफ्ट बॉक्स मधून गिफ्ट म्हणून सुद्धा एकमेकांना दिले जाते.