पितृ पक्षातील ‘या’ संकेतांचा अर्थ घ्या समजून

पितृ पक्षाच्या दरम्यान, जर तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचेत फुले आणि पाने घेतलेल पाहिले तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होतील.जर कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पेंढा घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते.जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा हिरव्या झाडावर बसला असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे

    मुंबई : पितृपक्षाला २० सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत हे दिवस आपल्या पूर्वजांसाठी असतात. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात.हिंदूमध्ये पितृपक्षात कावळे हे पूर्वजांचे प्रतीक मानले जातात आणि त्यांना गवत देण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, जर कावळ्याने या दरम्यान तुमचा घास खाल्ला अथवा शिवला तर तो थेट पूर्वजांना प्राप्त होतो. जाणून घेऊयात असेच काही शुभ संकेत…

    पितृ पक्षाच्या दरम्यान, जर तुम्ही तुमच्या घराभोवती कावळ्याच्या चोचेत फुले आणि पाने घेतलेल पाहिले तर याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याकडून जे काही मागाल त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छा पूर्ण होतील.जर कावळा श्राद्ध पक्षाच्या दरम्यान चोचीत कोरडा पेंढा घेऊन जाताना दिसला तर ते धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते.जर कावळा घराच्या छतावर बसला असेल किंवा हिरव्या झाडावर बसला असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या घरात सुख आणि समृद्धी नांदेल.जर कावळा गाईच्या पाठीवर चोच चोळताना दिसला तर त्या घरात आनंदाचे आणि चांगल्या अन्नाचे लक्षण आहे. दुसरीकडे, जर कावळा डुकराच्या पाठीवर बसलेला दिसला तर त्यातून मोठ्या धन प्राप्तीचा संकेत मिळतो.जर कावळा धुळीत लोळताना दिसला, तर याचा अर्थ असा की तेथे राहणाऱ्या लोकांच्या घरी लवकरच पैशांचे आगमन होईल आणि जर कावळा धान्याच्या ढिगावर बसलेला आढळला तर ते देखील समृद्धीचे प्रतीक आहे.