केळ्याच्या सालींचा करा अशा प्रकारे उपयोग!

    केळी ( banana)  हे पोषक तत्वांचे भांडार असे फळ आहे. केळी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, तुम्हाला केळीच्या सालीचे ( banana peels) आरोग्य फायदे माहित आहेत का? होय, केळ्याची साल ( banana peels)आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. केळीच्या सालीचा तुम्हाला काय उपयोग होतो हे जर समजलं, तर तुम्ही केळीची साल लगेच फेकणार नाहीत. केळीची साल अनेक गोष्टीत कामात येते. पिकलेल्या केळीची साल दातांना (teeth) लावली तर दात पांढरे(white teeth)  होतात, मात्र कच्ची केळी खाल्ले तर दात काही दिवस पिवळे राहतात.

    तुम्हाला मच्छर(Mosquitoes) चावल्याच्या जागी पिकलेल्या केळीची साल लावली तर आग बंद होते. तसेच चावलेल्या जागी पिकलेल्या केळीची सालही घासतात.रोगप्रतिकारक शक्ती: केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ए चांगली असते, जी रोगप्रतिकार शक्ती (power) मजबूत करण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. केळीच्या सालीचा आहारात (food) समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते.

    केळीच्या सालीचा वापर हा चेहऱ्यासाठी देखील केला जातो, चेहऱ्यावरील (face) येणाऱ्या फोड, पुरळ यावर केळीची साल लावसी असता, फोड, पुरळ कमी होण्यास मदत होते. आणि चेहऱ्यावर तेज येण्यास मदत होते.