असे ठेवा तुमचे हात सुंदर आणि आकर्षक; ‘या’ टीप्स ठरतील खूपच उपयुक्त

हातांना नेलपॉलिश लावा किंवा अन्य काही करा, या सांध्यांच्या काळेपणामुळे त्यांचा फारसा उपयोग होत नाही. या पार्श्वभूमीवर काही घरगुती उपाय उपयोगाचे ठरू शकतात.

    सौंदर्य जपण्यासाठी महिला तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करत असतात. मात्र, काही वेळा बरेच प्रयत्न करूनही बोटांमधील सांधे काळपट राहतात. हा काळपटपणा चटकन जात नाही. त्यामुळे हाताचे सौंदर्य फिके पडते.

    घरगुती उपाय

    – लिंबू आणि साखरेचे मिश्रण बोटांच्या काळवट भागावर रगडावे. त्यानंतर एखादे क्रिम त्यावर लावावे.

    – तसेच दुधाची साय ही काळेपणा दूर होण्यासाठी खूप उपयोगाची ठरते. 15 मिनिटे साय लावून ठेवावी. मग त्यावर लिंबू रगडावे आणि गार पाण्याने धुऊन टाकावे. धुतल्यावर त्यावर मॉश्चरायझर लावावे.

    – अंघोळ करताना नेहमी बोटांना स्क्रब करावे. नंतर त्यावर क्रीम किंवा लोशन लावावे. जेणेकरून ते ड्राय होणार नाही.

    – नुसते लिंबू जरी काळ्या भागावर रगडले तरी खूप चांगला परिणाम दिसून येतो.

    – ताकाचाही यासाठी वापर करता येतो. ताकात लिंबाचा काही थेंब रस टाकून हे मिश्रण त्वचेवर लावावे. 10-15 मिनिटांनी गरम पाण्याने धुऊन टाकावे.

    ऋतुनुसार करा बदल सध्या ऋतू बदलत आहे.

    बदलत्या ऋतूचा सर्वप्रथम त्वचेवर परिणाम होतो. त्वचेचे प्रकारही भिन्न भिन्न असतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्यात जास्त त्रास होतो तर कोरड्या त्वचेला कोरडी हवा त्रासदायक ठरते. हिवाळ्याचा काढता पाय आणि मध्येमध्ये असणारी कोरडी हवा यामुळे कोरड्या त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. अशा त्वचेची साधे-सोपे उपाय करून सहज देखभाल करता येते.

    कोरडी त्वचा असणाऱ्यांनी या ऋतुत पटकन आंघोळ करावी. जास्त वेळ शॉवर घेतल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होते. म्हणून जास्त वेळ शरीरावर पाणी टाकत राहू नये. इतकेच नाही रोज कडक पाण्याचा वापर टाळावा. साबणही फारसा वापरू नये. खास करून चेहऱ्यावर बेसन, मलर्इ किंवा उटणे लावावे. आंघोळ केल्यानंतर शरीर कधीही घासून पूसू नये.

    गरम टॉवेलने त्वचा थोपटून पुसावी आणि त्वरित मॉर्इश्चरायझर लावावे. मॉर्इश्चरायझरऐवजी रोज लोशन किवा तेलाचाही वापर करता येतो. थोडक्यात त्वचेतील ओलावा सतत टिकवण्यासाठी प्रयत्न करावा. भरपूर प्रमाणात पाणी पिण्याची सवय कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील आर्द्रता कमी होते. तसेच थंड, वेगवान हवेत किंवा तीव्र उन्हात शरीर पूर्णपणे झाकलेले पाहिजे. तसेच सुती कपड्यांचा वापर करावा.