
संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आता दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना हा प्रश्न पडला असेल कि आपल्या जवळच्या व्यक्तीला काय गिफ्ट्स घ्यावे? तर मग या विचारात जास्त वेळ न घालवता तुमचा व्हॅलंटाईन डे आनंदात साजरा करा...
संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आता दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे बऱ्याचजणांना हा प्रश्न पडला असेल कि आपल्या जवळच्या व्यक्तीला काय गिफ्ट्स घ्यावे? तर मग या विचारात जास्त वेळ न घालवता तुमचा व्हॅलंटाईन डे आनंदात साजरा करा… कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कुठल्या गोष्टी तुम्ही भेट स्वरूपात देऊ शकता..चला तर मग पाहुयात या दिवसाला तुमच्या आयुष्यातील अनमोल आठवण बनवण्यासाठी कुठल्या भेटवस्तूंचा ट्रेंड सोशल मीडियावर चालू आहे.
१) कपल फोटो फ्रेम
या स्पेशल दिवसाला आणखीन स्पेशल बनवण्यासाठी फोटो स्टॅन्ड, फोटो फ्रेम, कॉफी मग देण्याचा भन्नाट ट्रेंड चालू झाला आहे. प्रेमींच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण फोटोमध्ये कैद करून एक अनमोल आठवण साठवून ठेवण्यासाठी हि भेटवस्तू अतिशय सुंदर वाटते. कपल फोटो फ्रेम बनवून हि भेटवस्तू तुम्ही देऊ शकता.
२) Personalised photography cushion
हि भेटवस्तू देण्याचा ट्रेंड जास्त वाढला आहे. त्या cushion वर तुम्ही तुमचे फोटो लावू शकता. जर हा तुमचा पहिला व्हॅलंटाईन डे असेल तर हि भेटवस्तू अतिशय सुंदर वाटेल. कपल फोटो व्यतिरिक्त लव्ह बर्ड, हार्ट, रिंग डिझाईन अशाप्रकारे cushion सजवता येईल. सद्या मार्केटमध्ये LED cushion उपलब्ध आहेत.
३) handwriting bracelet
प्रेम बंधनात त्या स्पेशल व्यक्तीच नाव आपल्यासाठी खूप महत्वाचे असते. हे नाव आणि त्या व्यक्तीच्या सर्व आठवणी आपल्या सोबत रहाव्यात यासाठी तुमच्या नावाचे handwriting bracelet तुम्ही गिफ्ट करू शकता. हातातील सेम हँडबॅन्ड, गळ्यातील लॉकेट्स, रिंग भेटवस्तू म्हणून दिल्या जात आहेत.
४) फोटो अल्बम
जर तुमच रिलेशनशिप खूप वर्षांपासून असेल तर पहिल्या भेटीपासूनचे तुमचे फोटो एकत्र करून प्रेमाच्या आठवणींचा हा अनमोल ठेवा भेटवस्तू देण्याचा ट्रेंड वाढला आहे. फोटोसोबत तुम्ही तुमच्या प्रियकरास/ प्रियसीला काही संदेश लिहू शकता. त्यामुळे हे गिफ्ट आणखीन स्पेशल होईल.
५) की होल्डर
आजकाल प्रत्येक कपलकडे गाडी असतेच. त्यासाठी लाकडापासून बनवलेले की होल्डर मोठ्या प्रमाणात भेट म्ह्णून दिली जातात. त्यावर नाव, फोटो, हार्ट्स, नेम सिम्बॉल काढण्याचा एक वेगळाच ट्रेंड दिसतो. हे गिफ्ट छोटे दिसत असले तरी नेहमी सोबत राहील असे गिफ्ट आहे.