क्या बात है! सिंहाने महिलेला मीठी मारून दिली ‘जादू की झप्पी’ ; VIDEO तुफान व्हायरल

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला पिंजऱ्याजवळ जाताच पिंजऱ्याच्या आत बंद असलेल्या सिंहानं आपलं अंग बाहेर काढत या महिलेला मिठी मारली आहे. ज्या सिंहाला संपूर्ण जंगल घाबरतं त्याच सिंहानं या महिलेला प्रेमानं मीठी मारली आहे. हे दृश्य पाहून प्रेक्षकांचं मन हळवं झालं आहे.

    सध्या व्हॅलेंटाईन डेचं ऊत सगळ्यांना लागलं आहे. हे दिवसच असे आहेत की, दोन प्रेमी ऐकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आपलं आयुष्य गोडधोड नात्याने सुरू करतात. परंतु आज आपण सगळ्या प्रेमाचा पाऊस न पाडता. फक्त आजच्या दिवसाचा विचार करणार आहोत. तर आजचा दिवस आहे हग डे. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त दोन प्रेमींकरता हा दिवस नसून प्राणी, पशू-पक्षी आणि सर्व सजीवांना तो लागू होतो. खरं प्रेम म्हणजे काय? या भावनात्मक गोष्टीची संकल्पना आज आपल्याला दिसून येते.

    आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार या सिंहाचे नाव जुपिटर आहे. या जुपिटरनं या महिलेला मिठी मारली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला पिंजऱ्याजवळ जाताच पिंजऱ्याच्या आत बंद असलेल्या सिंहानं आपलं अंग बाहेर काढत या महिलेला मिठी मारली आहे. ज्या सिंहाला संपूर्ण जंगल घाबरतं त्याच सिंहानं या महिलेला प्रेमानं मीठी मारली आहे. हे दृश्य पाहून प्रेक्षकांचं मन हळवं झालं आहे.