vat purnima

वास्तविक वटसावित्रीचे व्रत (Vatsavitri Vrat) हे तीन दिवसांचे असते. मात्र ज्यांना तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करावे, असे सांगण्यात आले आहे. (Vat Purnima 2022) जाणून घेऊयात या व्रताच्या पूजाविधीविषयी (Vat Purnima Puja Vidhi).

  सावित्रीच्या प्रयत्नांनंतर यमदेवांनी वडाच्या झाडाखाली सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा (Vat Purnima 2022) नावाने ओळखली जाते.  या दिवशी सुवासिनी  वडाच्या झाडाची पूजा करतात. वास्तविक वटसावित्रीचे व्रत (Vatsavitri Vrat) हे तीन दिवसांचे असते. मात्र ज्यांना तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत करावे, असे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊयात या व्रताच्या पूजाविधीविषयी (Vat Purnima Puja Vidhi).

  वटसावित्रीच्या दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. स्नान करुन वडाचे पूजन केले जाते. यावर्षी १४ जून मंगळवार रोजी वट पौर्णिमा आहे.

  वटपौर्णिमाः १४ जून २०२२
  पौर्णिमा प्रारंभः १३ जून २०२२ रोजी उत्तर रात्रौ ९ वाजून ०३ मिनिटे.
  पौर्णिमा समाप्तीः १४ जून २०२२ रोजी सायं. ०५ वाजून २२ मिनिटे.

  पूजा साहित्य – हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.

  पूजन विधी – सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी.गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे. हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे. वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.

  प्रदक्षिणा घालताना म्हणायचा मंत्र
  “ सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
  तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
  अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
  अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”

  पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.

  प्रार्थना -‘मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.

  वड हा आपल्या सावलीत आंपल्या सानिध्यात अनेक जिवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो. म्हणून वडाची पूजा करण्यामागे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ची जाणीव पेरणे हा ही एक उद्देश आहेच. वडाच्या पारंब्या सारख्याच जन्मोजन्मीच्या गाठी ह्या बांधलेल्या असतात.