लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाने केलं असं काही ; संतापलेल्या नवरीनं श्रीमुखात दिली ठेवून अन् झाला ना VIDEO VIRAL

वरमाळेदरम्यान एक नातेवाईक नवरीला नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालण्यासाठी उचलून घेतो. यानंतर नवरी नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालते खरी पण खाली उतरताच ती आपल्या नातेवाईकाच्या गालात जोरात चापट मारते.

  नवी दिल्ली : कोरोना (Coronavirus) काळात लग्नसमारंभातील पाहुण्यांच्या उपस्थितीबाबतही अनेक नवे नियम (Coronavirus wedding rules) आहेत. अशात खूपच कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळे पार पडतात. त्यामुळे, लोक आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लग्नाचे व्हिडिओ (Wedding Video) पाहाताना दिसतात. त्यामुळे, असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.

  भारतात लग्न म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणं केलं जातं. लग्नात सर्वात खास वेळ असते ती वरमाळेची. जेव्हा नवरी (Bride) आणि नवरदेव (Groom) एकमेकांना वरमाळा घालतात. या दरम्यान अनेकदा अशा घटना घडतात, ज्या नंतर खूप गोड किंवा नको वाटणाऱ्या आठवणींच्या स्वरुपात कायम स्मरणात राहातात.

  सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की वरमाळेदरम्यान एक नातेवाईक नवरीला नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालण्यासाठी उचलून घेतो. यानंतर नवरी नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घालते खरी पण खाली उतरताच ती आपल्या नातेवाईकाच्या गालात जोरात चापट मारते.

  हा थ्रोबॅक व्हिडिओ २०१८ मधील आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की संतापलेली नवरी स्टेजवरच नातेवाईकाच्या कानशिलात लगावते. वरमाळेवेळी नवरदेवाचा एक नातेवाईक नवरदेवाला उचलून वर घेतो. यानंतर नवरीकडचा एक नातेवाईकही स्टेजवर येतो आणि नवरीला उचलून घेतो. वरमाळा घालताच नवरीबाई रागात खाली उतरते.

  यानंतर ती मागे वळून या व्यक्तीला जोरात कानशिलात लगावते. नवरीबाईला इतका राग नेमका कशाचा आला, याबाबत सांगणं कठीण आहे. आपल्या डोळ्यांसमोर हे नेमकं काय घडतंय याचा अंदाजच बराच वेळ नवरदेवाला येत नाही.

  video viral angry bride slaps to relative on wedding stage know the details