वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा, सरकारी नियमांचे पालन करा

    वृश्चिक (Scorpio) :

    एकूण ग्रहमान पाहता य़ा सप्ताहात आपण हाती घेतलेल्या कामांची पूर्तता होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. स्थावरबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींची प्रकृती जपा. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. सरकारी नियमांचे पालन करा. आपल्या नावाचा गवगवा होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या प्रश्नांना सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराशी जुळवून घ्या.