वृषभ साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; दूरच्या आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटीचे योग संभवतात

    वृषभ (Taurus) :

    एकूण ग्रहमान पाहता या सप्ताहात कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान मिळू शकेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. सरकारी नियम व कायदा यांचे कटाक्षाने पालन करा. दूरच्या आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटीचे योग संभवतात. नातलगांशी सामंजस्याने वागल्यास होणारा गैरसमज टाळू शकाल. मुलांकडे त्यांच्या करिअरसंबंधीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर वेळीच पायबंद घाला. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.