मिथुन साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; अचानक प्रवासाचे योग संभवतात, हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल

    मिथुन (Gemini) :

    एकूण ग्रहमान पाहता आपणास विविध प्रकारच्या प्रश्नांना, विशेषतः कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. अचानक प्रवासाचे योग संभवतात. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. स्थावरसंबंधीच्या प्रश्नांची उकल करता येईल. कौटुंबिक वातावरण वादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. विद्यार्थ्यांनी अध्ययनात परिश्रम वाढवावे. आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे हितकारक ठरणार आहे. प्रकृतीच्या लहान-सहान कुरुबुरी उद्भवण्याची शक्यता आहे, तेव्हा जपा. जोडीदाराची साथ मिळेल.