मेष साप्ताहिक राशीभविष्य १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२२ ; कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य देऊन, त्यांच्या प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न करा

    मेष (Aries) :

    आपले ग्रहमान पाहता आपण घेत असलेल्या परिश्रमाला योग्य न्याय दिल्यास खऱ्या अर्थाने समाधान मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळेल. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाही याची दक्षता घ्या. स्थावरबाबतीतील प्रश्न सोडविता येतील. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य देऊन, त्यांच्या प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न करा. आपल्या परिश्रमाला योग्य न्याय मिळेल. विद्यार्थीवर्गाला श्रम वाढवून यशाची अपेक्षा बाळगता येईल. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.