साप्ताहिक राशीभविष्य, १३ जून ते १९ जून २०२२; पाहा कसा असेल तुमचा हा आठवडा

  • मेष

  या आठवड्यात सर्व बाबतीतील निर्णय शांतपणे, विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. महिलांना त्यांच्या कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक राहील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या भवितव्याचा विचार करा. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृतीची पथ्ये पाळा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • वृषभ  

  या आठवड्यात आपण घेत असलेल्या परिश्रमांना अपेक्षित यश मिळू शकते. आपल्या परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाही याची दक्षता घ्या. आप्तेष्टांशी सौदार्याने वागणे इष्ट राहील. रागावर योग्य नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ छान राहील. कोणालाही जामीन राहू नका. प्रतिष्ठित व्यक्तींचा सल्लागार म्हणून काम करता येईल. संततीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभवार्ता कळू शकते. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आपल्या प्रयत्नांना सफलता मिळेल. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

  • मिथुन  

  या आठवड्यात आपणास अपेक्षित असलेल्या बहुतांश गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. कामानिमित्त प्रवास योग संभवतात. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. दूरच्या प्रवासाचे संकेत मिळतील, पण प्रवासात सावधानता बाळगा. काही भाग्यवंतांना विवाहबंधनाचे योग संभवतात. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. तुमची आवक व खर्च यामध्ये तफावत राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक बाजू सुधारण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराशी जुळवून घ्या.

  • कर्क

  या सप्ताहात काही आनंददायी क्षण व घटना यांचा आपणास अनुभव येण्याची शक्यता राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तेव्हा प्रथमपासून अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. स्थावर मालमत्तेसंबंधीच्या प्रश्नांना गती मिळेल. काही आनंददायी प्रसंगांचे संकेत मिळतील.  मुलांच्या प्रश्नांचा प्राथम्याने विचार करा. मित्रमंडळी, आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. सरकारी नियमांचे पालन करा. विद्यार्थीवर्गाने अध्ययनात विशेष लक्ष द्यावे. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

  • सिंह

  या आठवड्यात कौटुंबिक गोष्टींना आपण प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. कलाक्षेत्राला हा काळ उत्तम असून, महिलांना त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रवास योग संभवतात. सरकारी नियमांचे पालन करा. नोकरदारांना दिलासा मिळेल. विवाहइच्छुकांना जोडीदाराची साथ मिळण्याची शक्यता राहील. स्थावर मालमत्तेसंबंधीच्या गोष्टी मार्गी लागतील. कोर्टकचेरीच्या कामांना सफलता मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नोकरदारांना नव्या जबाबदाऱ्या पडण्याची शक्यता राहील. विद्यार्थीवर्गाने अध्ययनात विशेष लक्ष द्यावे. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, पोटाच्या तक्रारींबाबत सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • कन्या  

  या आठवड्यात प्रत्येक बाबतीत आपण संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास आपणास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवासात सावधानता बाळगा. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. दूरच्या आप्तेष्टांच्या, मित्रमंडळींच्या संपर्कात राहाल. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पुऱ्या होतील. आर्थिक बाजू ठीक राहील. ज्येष्ठांच्या प्रकृती जपा. मुलांकडे अधिक लक्ष द्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • तूळ  

  या सप्ताहात प्रत्येक बाबतीत आपण आत्मविश्वासाने वागल्यास आवश्यक गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. प्रलोभनांपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा, त्यांना संधी देऊ नका. महिलांना त्यांच्या कलागुणांना उत्तम वाव मिळेल. बौद्धिक क्षेत्राला चालना मिळेल. विद्यार्थीवर्गाला त्यांच्या मेहनतीचे श्रेय पदरात पाडता येईल. अचानक प्रवास योग संभवतात. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या प्रश्नांना सामोरे जा. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा काळ छान राहील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, पोटाच्या तक्रारींपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • वृश्चिक  

  या आठवड्यात आपण आपली मानसिकता सकारात्मक ठेवल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करता येतील. आपली चिंतेची भावना योग्य प्रमाणात राहील. स्थावर मालमत्तेविषयी अनुकूलता वाढेल. कोर्टकचेरीच्या कामात सफलता संभवते. कामाचे योग्य नियोजन करा. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रवास योग येतील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, विशेषतः उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • धनू  

  या आठवड्यात आर्थिक बाबतीतील योग्य नियोजन केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. आपल्या मनातील अनेक योजना साकार करणे शक्य होईल. स्थावर मालमत्तेसंबंधीचे प्रश्न सोडविता येतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रलोभनांपासून दूर राहा. आपल्या कार्याचे कौतुक केले जाईल. आर्थिक गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्यानेच करा. घरगुती वातावरण चांगले ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. रागावर योग्य नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

  • मकर

  या आठवड्यात पारिवारिक गोष्टींना प्राधान्य देऊन समाधान मिळविता येईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम प्रतिसाद मिळेल. महिलांच्या कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. स्थावर मालमत्तेसंबंधीचे प्रश्न सोडविता येतील. कुटुंबापासून नोकरीनिमित्त दूर जाण्याची शक्यता संभवते. प्रवासाचे योग येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रवासात सावधानता बाळगा. कुटुंबातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • कुंभ  

  या आठवड्यात आपल्याला मनाप्रमाणे इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने आपल्या योजना कार्यान्वित करता येतील. आर्थिक बाजू सावरता येईल. घरगुती वातावरण लहान-सहान वादविवादाच्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या बोलण्याने इतरांचे गैरसमज होणार नाही हे पहा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आपला जम बसविता येईल. छोटे प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या प्रश्नांना सामोरे जा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.

  • मीन

  या आठवड्यात आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांना दिलासा मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थीवर्गाला, विशेषतः संगणक, तांत्रिक क्षेत्र या संदर्भातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवा. आपल्या विवेकबुद्धीने शत्रूपक्षावर मात करू शकाल. आध्यात्मिक प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, किरकोळ आजारांपासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल.