साप्ताहिक राशीभविष्य; मीन राशीने टाळा प्रलोभनं, पाहा कसा असेल तुमचा हा आठवडा

  • मेष :

  आपणाला आपल्या कार्यक्षेत्रात धैर्याने वागणे व दुप्पट जोमाने काम करणे हितकारक राहील. नव्या योजना हातात घेण्याआधी बारकाईने त्याचा पुढचा-मागचा विचार करूनच निर्णय घ्यावा. क्रीडा व राजकीय क्षेत्रांत आपण जम बसवू शकाल. विवाहइच्छुकांना मोठा दिलासा मिळेल. अति आत्मविश्वास टाळावा. नोकरदारांना हा काळ चांगला आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. ज्येष्ठांच्या प्रकृतीबाबत अधिक सावधानता बाळगा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष घालावे. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्या. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा.

  • वृषभ :

  आपली मानसिकता कोणत्याही कारणांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. नोकरदारांनी वरिष्ठांची नाराजी न पत्करता सबुरीचा सल्ला मानावा. आर्थिक बाबतीत सध्या गुंतवणूक करणे टाळणे आपणास हितकारक राहू शकेल. आर्थिक बाजू ठीक राहील. काही जुने येणे मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. शारीरिक व्यायामाद्वारे आणि योगाद्वारे आपले शरीर संतुलनात येऊ शकेल. स्वजनाशी येणारे वादाचे प्रसंग टाळा. प्रकृतीस्वास्थ्य जपा.

  • ​मिथुन :

  या सप्ताहात स्वत:ला भक्कमपणे उभे करण्याची गरज आहे. आपल्या स्वभावाला मुरड घालून हटवादीपणा कमी करण्याचा प्रयत्न केल्यास आपण ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. भावनेच्या भरात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. प्रकृतीबाबत आपण जागरूक राहावे, विशेषत: श्वसनाचा त्रास संभवतो. कुठे काय बोलावे याचा विचार करावा. नव्या कामासाठी आपण उत्साही राहाल. प्रकृतीबाबत जागरूक राहा, विशेषत: दाताचे विकार, डोकेदुखी इत्यादी. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहाल. मानसिकता चांगली राहण्यासाठी हिंडणे-फिरणे उपयोगी पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

  • ​कर्क :

  या सप्ताहात आपल्या विचारानुसार सर्व व्हावे असे कार्यक्षेत्रात वाटते पण काहीशी निराशाने त्याला खिळ बसते. परंतु समजूतदारपणे समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्यास आपणास उत्तम परिणाम झालेले दिसून येतील. आपल्या बोलण्याने कुटुंबातील वातावरण बिघडू देऊ नका. प्रवासाचे योग येतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. व्यवसायाला चालना मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. प्रलोभने टाळा.

  • ​सिंह :

  आपणास बहुतांश कार्यात सतर्क राहून वागणे हितकारक ठरू शकते. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. आर्थिक गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने करावी, फाजील विश्वास कोणावर ठेवू नये. शेतीविषयक कामांना गती मिळेल. कोर्टकचेरीच्या कामात सुलभता येईल. हितशत्रूंच्या कारवायांबद्दल चिंता करू नये, फक्त त्यांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या. प्रकृतीबाबत जागरूक राहा, विशेषत: उष्णतेचे विकार, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

  • ​​कन्या :

  नोकरी-व्यवसायात काम करणाऱ्यांना उत्तम संधी मिळण्याची शक्यता राहील. काही वेळा कडक निर्णय घेण्याचे कारणे उद्भवू शकतात. आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपण आपल्या कौशल्याचा उपयोग करून घ्याल. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. प्रवास योग येतील. सामाजिक क्षेत्रात वाहवा होण्याची शक्यता राहील. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल, मानसिक तणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. जोडीदाराची साथ मिळेल.

  • ​तुळ :

  या सप्ताहात आपली परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहू शकेल. बरेच दिवस प्रलंबित असलेले घराचे अथवा वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. काही भाग्यवंतांना प्रकाशाचे वलय प्राप्त होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू सावरता येईल. विचारांना काहीसे आक्रमक ठेवावे लागेल. शेतीविषयक कामांना गती मिळेल. नातलगांबाबत हा सप्ताह एवढा चांगला नाही. कौटुंबिक वातावरण वादविवादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

  • ​वृश्चिक :

  या आठवड्यात आपणास ग्रहमानाची बऱ्यापैकी साथ मिळणार असल्याने पुष्कळशा बाबतीत लाभदायक गोष्टींचे शुभ संदेश मिळू लागतील. नोकरदारांना चांगला काळ असून काहींना नव्या जबाबदाऱ्या पडण्याची शक्यता राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. प्रलोभनांपासून दूर राहा. अचानक प्रवासाचे योग संभवतात. नोकरदारांना मोठा दिलासा मिळू शकेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग संभवतात. तुमचा विश्वास तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळवून देऊ शकेल. प्रकृतीबाबत हवामानबदलामुळे पसरणाऱ्या रोगापासून सावध राहा. विवाहित जोडीदाराची उत्तम साथ मिळू शकेल.

  • ​धनु :

  या सप्ताहात आपल्या रागावर व बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास आपण पुष्कळ गोष्टी साध्य करू शकाल. नव्या नोकरीच्या शोधात असल्यास प्रयत्नांना सफलता मिळू शकते. गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याचे धोरण अंगीकारून आपला यशाचा मार्ग गाठू शकाल. गेल्या काही काळापासून आपण गोंधळलेल्या स्थितीत राहत आहात. मानसिक तणाव ठेवू नका. पूर्वीच्या कार्यक्षेत्राचा काळ आला आहे. नाती जपण्याचा आपला मनसुबा योग्य राहील. घरातील मंडळींना नाराज करू नका. येणाऱ्या समस्यांना सामंजस्याने सामोरे जा. प्रकृतीमान ठीक राहील. जोडीदाराशी जुळवून घ्या.

  • ​मकर :

  या आठवड्यात भाग्यापेक्षा आपले परिश्रम आपणास उपयोगी पडणार आहेत, त्याचप्रमाणे काही सावधानताही बाळगावी लागणार आहे. कामाचा उत्साह वाढीला लागेल. स्वार्थी लोकांपासून दूर राहा. चांगल्या-वाईटांना ओळखून वागा. प्रकृतीबाबत हलगर्जीपणा करू नका. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. बरीचशी कामे हातावेगळी करता येतील. जंक फूड खाण्याचे टाळा. मानसिकता छान राहण्यासाठी योगाचा आधार घ्या. फाजील विश्वास कोणावर टाकू नका. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. येणाऱ्या संधीचा लाभ घ्या. वैवाहिक जोडीदाराची नाराजी टाळा.

  • ​कुंभ :

  या सप्ताहात परिश्रमाची जोड देऊन कार्य करण्याचे धोरण स्वीकारल्यास बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. आपल्या हटवादीपणाला मुरड घाला व पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नव्या लोकांच्या भेटी संभवतात. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने प्रथमपासून अनावश्यक खर्च करण्यास प्रतिबंध करा. आपल्या वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग संभवतात. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ ठीक राहील. मानसिक शांतीसाठी निसर्ग सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा. घरगुती वातावरण छान राहील. वैवाहिक जोडीदाराचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

  • ​मीन :

  हा आठवडा सर्व दृष्टीने चांगला जाण्याची शक्यता आहे. आपणास आवश्यक असे अपेक्षित सहकार्य व मदतीचा हात मिळू शकेल. प्रवासाचे योग येतील. कला, संगीत क्षेत्रातील व्यक्तींना वाहवा मिळू शकेल. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न कराल. नको ती प्रलोभने कटाक्षाने टाळा. कुटुंबासमवेत आपण आपला वेळ घालवाल. तुमच्यासाठी नाती महत्त्वाची असतात. प्रवासात सावधानता बाळगा. सरकारी नियम व कायदा कटाक्षाने पाळा. नोकरदारांना दिलासा मिळेल. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.