साप्ताहिक राशीभविष्य २० जून ते २६ जून २०२१ : धनु राशीसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे; जाणून घ्या या आठवड्यात कशी असेल तुमची ग्रहदशा

  मेष :

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. आपण एखादी मोठी जवाबदारी स्वीकाराल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामात यश प्राप्त होईल असे असले तरी आपणास अति आत्मविश्वास टाळावा लागेल. आपणास कामात यश प्राप्त झाल्याने काही लोक आपली ईर्ष्या करतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपणास कोणत्याही प्रकारे आर्थिक त्रास होऊ नये म्हणून आपल्या पैश्यांची गुंतवणूक विचारपूर्वक करावी लागेल. विरोधकांवर नजर ठेवावी. खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. आठवड्याच्या मध्यास कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात आपण वैयक्तिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला असून त्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  वृषभ :

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. बँकेतील गंगाजळी सुद्धा वाढेल. पैश्यांची प्राप्ती होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात कपात होईल. आपल्या मनात स्नेहाची व प्रेमाची भावना निर्माण होईल व त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. नात्यात प्रेम व एकमेकांप्रती जवळीक वाढेल. प्रेमीजनांना सुद्धा ह्या आठवड्यात चांगले परिणाम मिळतील. आपल्या प्रियव्यक्तीस आपल्या प्रति जिव्हाळा निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची कामगिरी उत्तम होईल, मात्र काही लोक आपल्या विरुद्ध कट-कारस्थान रचण्याच्या शक्यतेमुळे आपणास सावध राहावे लागेल. विरोधकांवर नजर ठेवावी. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतिकारक आहे. आठवड्याच्या मध्यास आपण एखाद्या प्रवासास जाऊ शकता. प्रवासामुळे आपणास नवीन ऊर्जा प्राप्त होईल.

  मिथुन :

  हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखाद्या प्रवासास जाण्याची तयारी कराल. आपणास आपल्या मित्रांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे आपणास अनेक कामात मदत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी आनंददायी बातमी मिळेल. आपली कामगिरी उत्तम होईल. व्यापाऱ्यांच्या व्यापारात वृद्धी होईल. त्यांना आपला नफा वाढविण्यात यश प्राप्त होईल. खर्चात कपात होईल व प्राप्तीत वाढ होईल. त्यामुळे आपणास कोणत्याही प्रकारे आर्थिक चणचण भासणार नाही. आरोग्य उत्तम राहील. असे असले तरी खाण्या-पिण्यावर लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात जिव्हाळा व समजूतदारपणा वाढेल. आपल्या कुटुंबात एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन संभवते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी विशेष अनुकूल नसल्याने प्रेमीजनांनी सावध राहावे.

  कर्क :

  हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या कुटुंबियांसाठी खूप काही करण्याची आपली इच्छा होईल. त्यांच्याप्रती आपण संवेदनशील व्हाल. आपल्या जवाबदाऱ्या आपण उत्तम प्रकारे पार पाडाल. घरगुती खर्चात आपला सिंहाचा वाटा असेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात सुद्धा वाढ संभवते. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे असमाधान होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या सहकाऱ्यांच्या वागणुकीमुळे आपली स्थिती पूर्वपदावर येईल. व्यापारीवर्गास प्रवासाचा चांगला फायदा होऊन व्यापारास गती येईल. विवाहितांच्या जीवनात आनंद पसरेल. आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रणयी जीवनात गोड बोलण्याचा कसा फायदा होतो हे आपल्या प्रियव्यक्तीस समजावून सांगावे लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्या हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहे.

  सिंह :

  हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील व त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळत असल्याचे दिसून येईल. आपली सर्जनात्मकता आपल्या कामास येईल. आपण एखादा नवीन छंद जोपासण्याचा सुद्धा प्रयत्न कराल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या नात्यात प्रेमाची भर पडेल. त्याच बरोबर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. विवाहितांचे जीवन काहीसे हेलकावे खाईल. जोडीदाराचे आरोग्य नाजूक होण्याची शक्यता असून आपणास त्याकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांनी आपल्या कष्टांवर विश्वास ठेवावा. आपणास सकारात्मक परिणाम मिळतील. व्यापारी वर्गानी ह्या आठवड्यात सावध राहावे. विनाकारण एखाद्याशी भांडण होण्याची शक्यता आहे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  कन्या :

  आठवड्यात आपणास नवीन काही करण्याची संधी मिळेल. आपण मानसिक तणावापासून मुक्त व्हाल. आपण आपला एखादा जुना छंद जोपासण्याचा प्रयत्न कराल. आपण आपल्या प्रियव्यक्तीच्या सहवासात आनंदात वेळ घालवाल. ह्या आठवड्यात आपण फिरावयास जाण्याची योजना आखाल. विवाहितांच्या जीवनात काही समस्या निर्माण होतील. विनाकारण गैरसमज होऊन नात्यात कटुता निर्माण होईल. अशा परिस्थितीत शांतपणे एकमेकांशी बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या कामात एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. ह्या नवीन कामावर आपणास लक्ष द्यावे लागेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा मोठे लाभ मिळवून देणारा आहे. आपल्या प्राप्तीत झपाट्याने वाढ झाल्याने आपला आत्मविश्वास दुणावेल. आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

  तूळ :

  हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आपण आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न कराल. आपला जोडीदार चुकीचे वर्तन करण्याची शक्यता असल्याने थोडे सावध राहावे व निष्कारण भांडण करणे टाळावे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला असला तरी त्यांना सुरवातीस एखाद्या विरोधास सामोरे जावे लागेल. हा विरोध झुगारण्यात आपण यशस्वी व्हाल. ह्या आठवड्यात शत्रूंच्या कारवाया वाढून आपणास त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आपण सावध राहावे. आपले आरोग्य उत्तम राहील. परंतु, आहारातील अतिरेक किंवा दिनचर्येतील असमतोलपणा आपले आरोग्य बिघडवू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे आपण चिंतीत व्हाल. ह्या आठवड्यात आपणास चांगली प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना एखादी चांगली बातमी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे.

  वृश्चिक :

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या समस्येचा योग्य तोडगा न निघाल्याने आपण काहीसे चिंताग्रस्त व्हाल. परंतु आठवड्याच्या मध्यास तोडगा निघून चांगला निर्णय घेता आल्याने आपण आनंदित व्हाल. कामात प्रगती होईल. परंतु अति आत्मविश्वास व एखाद्या कट – कारस्थाना पासून आपणास सावध राहावे लागेल. अन्यथा नोकरीच्या ठिकाणी आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. व्यापार वृद्धी करण्यावर आपले लक्ष केंद्रित होऊन त्याचा आपणास चांगला परिणाम मिळू शकेल. आपली प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. एखाद्या परोपकारी कार्यात आपण सहभागी व्हाल.

  धनु :

  आठवड्यात कुटुंबियांना दिलेली वचने आपण पूर्ण करू शकाल. दरम्यान व्यावसायिक जीवनातील स्थैर्य आपणास सार्वजनिक जीवनात मोठी जवाबदारी घेण्यास प्रेरित करेल. असे असले तरी आठवड्याच्या अखेरीस आपण थोडे सुस्त व्हाल. कोणत्याही कार्यात आपले योगदान शत – प्रतिशत नसेल. एकंदरीत हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्यात आपण मौज – मस्ती व आनंद कराल. आठवड्याच्या मध्यास आपणास एकाहून अधिक स्रोतातून लाभ होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात वैवाहिक व प्रणयी जीवनात गैरसमज होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आपण आपल्या जोडीदाराकडे अधिक आकर्षित व्हाल. जोडीदाराच्या सहवासात अधिक वेळ घालविण्याची इच्छा व्यक्त कराल. ह्या आठवड्यात आपल्यावर कामाचा अधिक ताण असेल. अशा परिस्थितीत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून अंतिम निर्णय घ्यावा. आठवड्याच्या अखेरीस काही कारणांमुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.

  मकर :

  हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपले कुटुंब व आपला व्यवसाय यात समतोल राखण्यावर आपण भर द्याल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आपले लक्ष राहील. आपण आपली कामे इमानदारीत कराल. लोक आपली प्रशंसा करतील. आपल्याला आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू नये म्हणून आपणास आपल्या वाढीव खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्राप्तीत थोडी वाढ संभवते. प्रेमीजनांना आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळेल. आपण आपल्या प्रियव्यक्तीस भेटवस्तू देऊ शकाल. विवाहितांच्या जीवनात समजूतदारपणा वाढेल व एकमेकांप्रती आपल्या जवाबदारीची जाणीव होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल व जुन्या आजारातून सुटका होईल. हा आठवडा प्रवासासाठी विशेष अनुकूल नाही.

  कुंभ :

  आठवड्यात आपणास नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. आपले वर्चस्व वाढेल व आपल्या कामगिरीमुळे समाजात प्रतिष्ठा सुद्धा उंचावेल. आपल्या कार्यालयात आपणास काही सुविधा उपलब्ध होतील व त्यामुवनात सळे आपले समाधान होईल. परंतु, वायफळ बडबड करून आपल्या वरिष्ठांची नाराजी ओढून घ्यावी लागू नये म्हणून आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावे. वैवाहिक समाधान लाभेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांनी आपल्या भावना सध्या व्यक्त करू नयेत. आठवड्याच्या मध्यास आपल्या खर्चात वाढ झाल्याने आपणास थोडा मानसिक त्रास होईल. अशावेळी आर्थिक नियोजन केले असल्यास थोडा दिलासा मिळू शकेल. आठवड्यात आपल्या आरोग्यात सुधारणा होईल.

  मीन :

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या अनेक इच्छा पूर्ण झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आठवड्यात आपण आपले मन मोकळे करू शकाल, अशी एखादी व्यक्ती आपणास आवडण्याची शक्यता आहे. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी खूपच चांगला असून त्यांचे कौशल्य खुलून उठेल. कुटुंबियांचे सहकार्य सुद्धा मिळू शकेल. व्यापारात अपेक्षित यश प्राप्त होईल. हाती आलेली संधी दवडू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल. आपले आरोग्य पूर्वीच्या मानाने चांगले राहील. तेलकट, तळकट इत्यादी पदार्थ आहारातून टाळल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. काही जातकांना परदेशी जाण्याची संधी मिळेल.

  Weekly Horoscope 20 June to 26 June 2021 This week is great for Sagittarius Find out what your planet will be like this week