साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ जून २०२२; पाहा कसा असेल तुमचा हा आठवडा

  • मेष

  कार्यक्षेत्रात एक नवा प्रोजेक्ट तुमच्यासाठी सफलता घेऊन येईल तसेच प्रगतीचा मार्ग विस्तारेल. एखादी अशी स्त्री जिने अतिशय मेहनतीने एक चांगले पद मिळवले असेल अश्या स्त्रीचे तुम्हाला सहकार्य लाभेल. धनवृद्धीचे शुभ संयोग बनत आहेत. आरोग्यातही तुम्हाला या आठवड्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल. कुटुंबात सुख-समृद्धीसाठी पैसे खर्च होतील. आठवड्याच्या शेवटी अचानक नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या.

   

  • ​वृषभ

  या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून भरपूर सहकार्य लाभेल. त्यामुळे तुमची प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे भविष्यात सकारात्मक परिणाम प्राप्त होईल. आर्थिक दृष्टीने हा काळ सामान्य आहे. गुंतवणुकीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रवास टाळणे फायद्याचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी सुखप्राप्ती होईल.

   

  • ​मिथुन

  कामात प्रगती होईल तसेच तुम्हाला अपेक्षित बदल पाहायला मिळतील. प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आर्थिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. एखादी नवी गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर आणि लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्री कडून मदत मिळेल. आठवड्याच्या शेवटी मन आंनदी राहील. तसेच आपल्या प्रियजनांच्या सान्निध्यात आनंद अनुभवाल.

   

  • ​कर्क

  कार्यक्षेत्रात प्रगती होईल तसेच आठवड्याच्या सुरुवातीलाच एखाद्या योजनेत यशप्राप्ती होईल. आर्थिक दृष्टीने या आठवड्यात तुम्ही गुंतवणुकीवर लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा समस्या वाढू शकतात. कोर्टकचेरीच्या कामांमुळे खर्च होऊ शकतो. या आठवड्यात प्रवास टाळणे फायद्याचे ठरेल.आठवड्याच्या मध्यात काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो.सप्ताहाच्या शेवटी आनंदाची बातमी मिळू शकते.

   

  • ​सिंह

  या आठवड्यात कार्यक्षेत्रात मन अशांत राहील,एखाद्या त्रासदायक बंधनात अडकल्यासारखे वाटेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अधिक खर्चाचा असेल.एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी खर्च करावा लागेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. कौटुंबिक आयुष्यात चांगला ताळमेळ राहील.

   

  • ​कन्या

  या आठवड्यात तुम्हाला सामान्य आरोग्य लाभेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती हळूहळू तुमच्यासाठी अनुकूल होईल.खर्च वाढेल. मित्र किंवा भावंडांसाठी पैसे खर्च कराल. कौटुंबिक स्थिती काहीशी नरम राहील.जवळची माणसे नाराज राहतील. प्रवास करणे टाळा.आठवड्याच्या शेवटी अतिशय चांगले योग बनतील.त्यामुळे मन प्रसन्न राहील.

   

  • ​तूळ

  कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुरूप अशी कामे होतील.तसेच यशप्राप्तीही होईल. आपल्या सहकाऱ्यांच्या भल्यासाठी काही ठोस निर्णय या आठवड्यात घेऊ शकता. आर्थिक समृद्धीसाठी तुमच्या बाजूने अधिक मेहनत करण्याची गरज आहे.कामाच्या निमित्ताने केलेला प्रवास सुखकर आणि लाभदायी ठरेल. आयुष्यात प्रगती साधायची असेल तर या आठवड्याच्या शेवटी थोडी जोखीम उचलून पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करा.

   

  • ​वृश्चिक

  आर्थिक दृष्टिकोनातून सुख-समृद्धीसाठी शुभ संयोग बनतील तसेच धनवृद्धीही होईल.कुटुंबात होणारी एक नवी सुरुवात मनाला प्रसन्नता प्रदान करेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. आपली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल.या आठवड्यात प्रवास करणे टाळा.आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमचे मन प्रफुल्लित करेल.

   

  • ​धनु

  नव्या विचारांनी वाटचाल केल्यास चांगले परिणाम बघायला मिळतील. इतरांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचे ऐकल्यास फायदा होईल. कुटुंबाकडून भरपूर सहकार्य लाभेल. तसेच तुमच्या कुटुंबासमवेत एखाद्या चांगल्या ठिकाणी राहायला जाण्याचा विचारही कराल. भावनेच्या भरात अधिक खर्च होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

   

  • ​मकर

  या आठवड्यात धनप्राप्तीचे सुखद संयोग बनत आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे.  कुटुंबात थोडे बदल जाणवतील तसेच येणारा काळ तुमच्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येईल.कार्यक्षेत्रात याकाळात साधारण वृद्धीचे संयोग बनत आहेत.शक्य असल्यास प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी काही व्यक्ती कायद्याशी संबंधित गोष्टींमुळे चिंताग्रस्त होऊ शकतात.

   

  • ​कुंभ

  कुटुंबाच्या सान्निध्यात मनःशांती लाभेल.या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य खासकरून महिला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील.या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे चांगले फळ मिळेल. प्रवासादरम्यान भरपूर खरेदीही कराल. हळूहळू धनवृद्धी होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेटवर्किंग मुळे तुम्हाला यशप्राप्ती होईल.

   

  • ​मीन

  कार्यक्षेत्रात प्रगती होईल.तसेच एखाद्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट मधून विषेश यश प्राप्त कराल. या आठवड्यात आर्थिक दृष्टीने वृद्धी होण्याचे योग बनत आहेत.तसेच कोणत्याही दोन गुंतवणुकींतून धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबात अनुकूल बदल घडवून आणण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या शेवटी यश,मान-सन्मान प्राप्त होईल.त्यासाठी शुभ संयोग बनत आहेत.