
मेष (Aries):
नियंत्रण ठेवा. या सप्ताहात आपण थोडे तारतम्याने वागणे आवश्यक आहे. वाहवत जाऊ नये. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे सौदे होतील. मित्रांच्या संगतीत अनावश्यक फिरस्ती, मौजमजेसाठी भटकंती करणे टाळणे योग्य ठरेल. काहीना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. घरी लोकांची ये-जा सुरू राहील. हितचिंतकांनी दिलेला सल्ला ऐकणे योग्य ठरेल.
वृषभ (Taurus):
घरात आनंदी वातावरण राहील. धनलक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. व्यवसायात चढ-उतार सुरू राहील. नोकरीत एकंदरीत चांगली परिस्थिती राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र जुने वाद उकरून काढू नका.
मिथुन (Gemini):
संयमाने वागणे. थोडा तणाव राहील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सावध राहा. अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा. ‘सोशल मीडिया’वर जपून प्रतिक्रिया द्या. नोकरीत बदली होऊ शकते. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांची काळजी घ्या. कुणाला स्वत:हून खेटू नका. कायद्याची बंधने पाळा. वाहने जपून चालवा. वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात विक्री जोरात होईल.
कर्क (Cancer):
जपून व्यवहार करा. या सप्ताहात आपली दगदग होईल. स्वतः च्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच घरातील इतरांकडेही लक्ष द्या. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. बेपर्वाई नको. आर्थिक गुंतवणूक, मालाची विक्री वगैरे फसव्या योजनांपासून सावध राहा. मोबाईलवरून तुमचे बँक खाते. क्रेडिट कार्डची माहिती, पिन नंबर, ओटीपी, पासवर्ड, गोपनीय माहिती कुणाला देऊ नका. कुणाशी भांडण उकरून काढू नका. वैमनस्य निर्माण होईल असे बोलू नका, काहींना अचानक धनलाभ होईल.
सिंह (Leo):
संमिश्र ग्रहमान. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र किरकोळ कारणावरून गैरसमज होईल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. अडचणी येतील; मात्र आपण समर्थपणे त्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. गृहसौख्य चांगले राहील. मात्र, एखाद्या सदस्याला तुमचे म्हणणे पटणार नाही. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे.
कन्या (Virgo):
संयम ठेवल्यास यश मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. जवळच्या लोकांशी हातचे राखून बोला. मनातील सगळे काही बोलून टाकू नका. मोठ्या खुबीने आपण अडचणींतून मार्ग काढाल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. ऐनवेळी महत्त्वाची वस्तू किंवा कागदपत्रे सापडणार नाहीत. तारांबळ उडेल. त्यामुळे नियोजनपूर्वक काम करावे.
तूळ (Libra):
कामात यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. एखादा धाडसी निर्णय घ्याल. महत्वाचा निर्णय घेताना जीवनसाथीचा अवश्य सल्ला घ्या. आपले सगळे व्यवहार इतरांना सांगू नका.
वृश्चिक (Scorpio):
अंदाज आर्थिक चुकतील. मन प्रसन्न राहील. कामात उत्साह राहील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मात्र आपली नाराजी राहील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. आर्थिक व्यवहार जपून करा. उसने पैसे देताना विचार करून निर्णय घ्या. घरात मतभेदांचे प्रसंग येतील. तुम्ही जे निर्णय घ्याल, ते पटतीलच असे नाही. त्यामुळे मन खट्ट होईल. घरी पाहुणे येतील. त्यामुळे थोडी लगबग राहील.
धनू (Sagittarius):
व्यस्त राहाल. या सप्ताहात अचानक प्रवासाचा योग येऊ शकतो. नोकरीत कदाचित बदली होऊ शकते. नवीन जबाबदारी अंगावर पडेल असे दिसते. काही लोक नोकरीत तुमच्या डोक्याला वैताग आणतील. कामाचा ताण वाढेल. आर्थिक आवक अतिशय उत्तम राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अडचणींचे निराकरण करण्यात आपण यशस्वी व्हाल. महत्वाचे काम पूर्वार्धात उरकून घेतलेले बरे. घरी राहणे होणार नाही. प्रेमात यश मिळेल.
मकर (Capricorn):
सावधानता बाळगा. घरात छोट्या-मोठ्या कारणांवरून मतभेद होतील. कुणावरही लगेच भरवसा टाकू नका. कुठेही पैसे गुंतवून टाकू नका. चार आण्याचे उद्यासाठी बारा आण्यांचे नुकसान होईल असे व्यवहार करू नका. वाहने कमी वेगाने चालवा. खर्चाला आवर घातला पाहिजे. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. तरुण वर्गाने चांगल्या मित्रांबरोबर ऊठबस करावी. सोशल मीडियावर जास्त वेळ वाया घालवू नये.
कुंभ (Capricorn):
सामान्य परिस्थिती. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. पाहुण्यांचे आगमन होईल. विविध प्रकारचे पदार्थ बनतील. मात्र, खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. चमचमीत पदार्थावर एकदम आडवा हात मारू नका. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मुलांशी संवाद साधा. वादविवाद टाळणे चांगले राहील. जीवनसाथीशी किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. तरुणांनी कायद्याची बंधने पाळणे आवश्यक आहे. वेळ वाया न घालवता योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
मीन (Pisces):
प्रेमात यश मिळेल. भरभराट होईल. अचानक मोठी संधी चालून येईल. कुणी गैरफायदा घेईल याची दक्षता घ्या. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल आहे. सकारात्मक अनुभव येतील. प्रेमात असाल तर पूर्णत्वास जाईल. आरोग्याची काळजी घ्या. काहीना कामानिमित्त प्रवास घडून येतील. काही पर्यटनास जातील. नोकरीत कदाचित बदली होऊ शकते. प्रकल्प सुरू करण्यात येतील. कागदोपत्री पूर्तता योग्य होत आहे की नाही खात्री करूनच सह्या करा.