कुंभ साप्ताहिक राशीभविष्य १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ ; नोकरी करणाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळू शकेल

    कुंभ (Aquarius) :

    आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी चांगलीच होईल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्यामुळे आपण आनंदित व्हाल. आपले प्रणयी जीवन सुखावह असेल. एकमेकातील समन्वय वाढेल. आपण आपल्या काही मित्रांची ओळख आपल्या प्रियव्यक्तीशी करून देऊ शकाल. विवाहितांच्या जीवनात काही तणावाचे वातावरण राहील, तेव्हा त्यांनी काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळू शकेल. आपली पदोन्नती संभवत असल्याने हातून कोणतीही चूक होऊ देऊ नका. व्यापाऱ्यांना परगावी जाऊन आपला व्यापार वाढविण्याचा प्रयत्न केल्यास त्यात यश प्राप्त होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल व पूर्वीपेक्षा आता आपणास अधिक तजेला जाणवेल.