कुंभ साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; आर्थिक नियोजन कराल, दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल

    कुंभ (Aquarius) :

    या आठवड्यात हट्ट सोडा. भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन काम हाती घेऊ नका. बौद्धिक आणि तार्किक कामे करा. पोटाच्या तक्रारी राहतील. यात्रा- प्रवास शक्यतो टाळा.