मेष साप्ताहिक राशीभविष्य १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ ; वरिष्ठांना आपले म्हणणे पटवून देण्यात यशस्वी झाल्याने आपण सहजपणे आपली कामे करू शकाल

    मेष (Aries) :

    हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्यात आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. ऋतुगत आजारां व्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला होण्याची शक्यता आहे. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात सुद्धा वाढ होणार आहे. तेव्हा त्याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. वरिष्ठांना आपले म्हणणे पटवून देण्यात यशस्वी झाल्याने आपण सहजपणे आपली कामे करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. कामात प्रगती होईल. एखाद्या नवीन क्षेत्रातून नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन कामे झाल्याने नवीन सौदे प्राप्त होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण असेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळण्यास सुरुवात होईल.