मेष साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल

    मेष (Aries):

    लक्ष्मीकृपेचा या आठवड्यात आपल्यावर वर्षाव होईल. सामाजिक पातळीवर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीने विवाहोत्सुकांना यश मिळेल. दुपारनंतर मात्र तब्बेत बिघडू शकते. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबात विरोध होईल. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या भानगडीत फसू नये. वाहन चालवताना अपघातापासून जपा.