कर्क साप्ताहिक राशीभविष्य १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ ; आव्हानांचा सामना करण्यात आपण यशस्वी व्हाल, वैवाहिक जीवन यशस्वी होईल

    कर्क (Cancer) :

    हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपण एखाद्या प्रवासास जाऊ शकाल. ह्या प्रवासा दरम्यान नवीन लोकांना व मित्रांना भेटण्याची संधी आपणास मिळेल. ज्याची आपणास उपयुक्तता लाभेल व आपल्याला कामाचा सल्ला मिळू शकेल अशा एखाद्या वृद्ध व्यक्तीशी आपली ओळख होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना सावध राहून काम करावे लागेल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यवसायात नवीन प्रयोग करूनच यश प्राप्त करता येईल. आरोग्याच्या बाबतीत आपण नशीबवान ठराल. आव्हानांचा सामना करण्यात आपण यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन यशस्वी होईल. आपणास आपल्या कामात वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मिळू शकेल. प्रेमीजनांना आपल्या प्रणयी जीवनात थोडी काळजी घ्यावी लागेल. आपल्या नात्यास गालबोट लागण्याची शक्यता आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.