साप्ताहिक राशिभविष्य दि. ०५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२१ : तरुण अधिक चांगल्या नोकर्‍या शोधण्यात व्यस्त राहतील

    मकर (Capricorn):

    गुरुवार सामान्य दिवस ठरणार आहे. अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल. खेळण्यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तरुण अधिक चांगल्या नोकर्‍या शोधण्यात व्यस्त राहतील. कार्यालयातील सहकारी आपल्या मदतीसाठी तयार असतील. पैसा आणि कायदेशीर प्रकरणे मार्गी लावण्यासाठी उत्तम दिवस. नवे मित्र भेटतील, नव्या गोष्टी शिकाल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद व सहकार्य मिळेल. संपूर्ण आठवडा आनंदात जाईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. आपल्यापेक्षा मोठ्या आणि ज्येष्ठ व्यक्तींकडून चांगला सन्मान मिळेल. शनिवारची सुरूवात अतिशय चांगली असेल. कामातून चांगलं धन मिळेल.