मकर साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; अचानक उद्भवणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा, निर्णय शक्तीचा अभाव राहील

    मकर (Capricorn) :

    या आठवड्यात आपले मन आनंदी राहील असे गणेशजी सांगतात. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. अचानक उद्भवणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. निर्णय शक्तीचा अभाव राहील. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपण आपले मन निराश होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील.