मिथुन साप्ताहिक राशीभविष्य ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२२ ; आठवड्यात एकंदरीत सुखांचा वर्षाव होईल

    मिथुन (Gemini) :

    हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण संततीवर प्रेमाचा वर्षाव कराल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. नात्याची वीण घट्ट झाल्याने आपण दोघे एकत्रितपणे अनेक कामे पूर्ण कराल. प्रेमीजनांच्या आयुष्यात सुरवातीस काही गैरसमज होऊन नात्यात थोडा दुरावा निर्माण होईल. दुरावा टाळण्यासाठी आपणास एकत्र बसून गैरसमज दूर करावे लागतील. आठवड्यात एकंदरीत सुखांचा वर्षाव होईल. नोकरीत चांगली कामगिरी होईल. व्यापाऱ्यांना व्यापारवृद्धीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रकृतीत मात्र सतत चढ – उतार येतील. ऋतुगत विकारांचा त्रास संभवतो. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. आठवड्यात नवीन मैत्री होईल.