मिथुन साप्ताहिक राशीभविष्य १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ ; आपण वैवाहिक सौख्याचा आनंद घेण्यासाठी एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकाल

    मिथुन (Gemini) :

    हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच पैश्यांचा ओघ सुरु होऊन आपल्या खर्चात कपात होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. असे असले तरी आपणास सासुरवाडी कडील एखादी तक्रार जी त्यांना अनेक दिवसां पासून सतावत आहे तिचे निराकरण करावे लागेल. त्यामुळे आपसातील संबंधात सुधारणा होऊ शकेल. ह्या आठवड्यात आपण वैवाहिक सौख्याचा आनंद घेण्यासाठी एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामाचे समाधान प्राप्त होईल. आपली बदली संभवते. सहकाऱ्यांशी असलेली आपली चांगली वर्तणूक आपले स्थान पक्के करू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या ताळेबंदावर लक्ष ठेवावे लागेल. खर्चात वाढ व प्राप्तीत कपात संभवते. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.