सिंह साप्ताहिक राशीभविष्य १२ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२१ ; आपला जोडीदार खुश झाल्याने आपले नाते संबंध अधिक दृढ होईल

    सिंह (Leo) :

    हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण वैवाहिक व प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा अत्यंत चांगला असून व्हेलेंटाईन डे आपण आनंदात साजरा करू शकाल. प्रेमालाप करण्याची संधी मिळेल. विवाहितांना सुद्धा आपल्या जोडीदारास खुश ठेवण्याची संधी मिळेल. आपला जोडीदार खुश झाल्याने आपले नाते संबंध अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कामे चांगली होऊन आपली प्रशंसा केली जाईल. व्यापाऱ्यांना भागीदारामुळे खूप मोठा फायदा होईल. भागीदार आपल्यापेक्षा अधिक कष्ट करेल व त्याचा आपणास सुद्धा फायदा होईल. आपली प्रकृती सामान्य राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. प्रवासामुळे आपल्या प्राप्तीत वाढ होईल.