सिंह साप्ताहिक राशीभविष्य १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ ; प्रेमालाप करण्याची संधी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल

    सिंह (Leo) :

    हा आठवडा आपल्यासाठी खूपच फायदेशीर होणारा आहे. आपण आपल्या कुटुंबियांच्या सहवासात बराच वेळ घालवून त्यांच्या गरजा समजून घ्याल. त्यांच्या सहकार्याने आपली अनेक कामे होतील. त्यांचा सल्ला नोकरीत उपयोगी पडून नोकरीतील आपली कामगिरी उंचावण्यास आपणास मदत होईल. व्यापाऱ्यांना स्पर्धक वाढल्याने थोडी काळजी घ्यावी लागेल. असे असले तरी आपली नीती फायदेशीर होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. त्यांनी आपल्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीस थारा देऊ नये. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. प्रेमालाप करण्याची संधी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आपली प्रिय व्यक्ती सुद्धा आपल्या बरोबरीने गंभीरतेने नात्यातील वाटचाल करेल. आपली प्रकृती उत्तम राहील. आपणास सन्मानित केले जाईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल.