सिंह साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; सासरच्या मंडळीसोबत बिघडलेले संबंध सुधरतील

    सिंह (Leo):

    अनैतिक आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य सतावेल. दुपारनंतर परदेशातून वार्ता येतील. संततीविषयक काळजी राहील. वरिष्ठांशी केलेला व्यवहार तुमच्या मनाला दुःख देईल. तरीही प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका. सासरच्या मंडळीसोबत बिघडलेले संबंध सुधरतील; अडकून पडलेला संपत्तीचा वाद मार्गी लागेल.