तुळ साप्ताहिक राशीभविष्य १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ ; आपल्या आहार विषयक सवयीत बदल करावा तसेच अतिरिक्त भोजन करण्याची आपली प्रवृत्ती सोडून द्यावी

    तुळ (Libra) :

    आठवड्याच्या सुरवातीस आपणास आपल्या व्यक्तिगत जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर वैवाहिक जीवनात काही समस्या किंवा असंतोष असेल तर ह्या आठवड्यात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नात्यात किंवा संबंधात आलेल्या ह्या समस्या आपणास अधीर व आक्रमक बनविण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास नात्यातील कटुता सुद्धा झेलावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास गंभीर नेत्र समस्या संभवते. आपल्या आहार विषयक सवयीत बदल करावा तसेच अतिरिक्त भोजन करण्याची आपली प्रवृत्ती सोडून द्यावी. ह्या आठवड्यात हात, पाय, पाठ सहित सर्व अंग दुखण्याची तसेच पोटाला सूज येण्याची समस्या उदभवण्याची शक्यता आहे. आपणास वरिष्ठांशी कोणत्याही विषयावर चर्चा करताना धीर धरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या अखेरीस काही बाबतीत मौन राहणेच अधिक प्रभावी होईल. ह्या आठवड्यात भागीदारी, न्यायालय, कार्यालयीन, सामाजिक व सार्वजनिक जीवनावर अधिक लक्ष द्यावे लागेल.