मीन साप्ताहिक राशीभविष्य ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२२ ; प्रणयी जीवनात आपल्या प्रियव्यक्तीच्या नाराजीमुळे काही अडचणी येण्याची शक्यता असल्याने तिला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा

    मीन (Pisces) :

    हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून आपल्या प्राप्तीत कशी वाढ करता येईल यावर आपले लक्ष केंद्रित झालेले असेल. मात्र, त्यामुळे आपला मानसिक त्रास खूपच वाढणार असल्याने काळजी घ्यावी. प्रणयी जीवनात आपल्या प्रियव्यक्तीच्या नाराजीमुळे काही अडचणी येण्याची शक्यता असल्याने तिला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत एखाद्या गोष्टीत आपला हट्ट सोडून न दिल्यास अपमानित व्हावे लागेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा चांगला आहे. आपली प्राप्ती सामान्यच राहील. आपल्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी आपली एकाग्रता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. आपले आरोग्य चांगले राहिले तरी आपणास थकवा व अशक्तपणा जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असली तरी, कामातील व्यस्ततेमुळे आपल्या प्रकृतीकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.