साप्ताहिक राशिभविष्य दि. ०५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२१ : प्रेयसीवर पैसे आणि वेळ खर्च करणे महागात पडू शकते

    मीन (Pisces):

    शुक्रवार तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कलात्मक कामांमध्ये आपली आवड वाढू शकते. पैशाच्या गुंतवणुकीबद्दल खूप गांभीर्याने विचार करा. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो. नवे काम आणि व्यवहार समोर येतील. महत्त्वपूर्ण मिटींग आणि काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रेयसीवर पैसे आणि वेळ खर्च करणे महागात पडू शकते. जवळचा मित्र-मैत्रीण शुक्रवारी विश्वासघात करू शकते. तुमच्या वागण्यातील बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. तुम्ही तुमच्या कामात परिश्रमपूर्वक काम कराल आणि कोणाच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील.