मीन २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२२ साप्ताहिक राशीभविष्य ; आपल्या प्राप्तीत उल्लेखनीय वाढ झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन नवीन काही करण्याची आपणास प्रेरणा होईल

    मीन (Pisces):

    या आठवड्याच्या मध्यास जीवनातील अनेक चढ – उतार आपल्या अनुभवास येतील. आपले आरोग्य सामान्यच राहील. मात्र, ऋतुगत त्रासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपल्या प्राप्तीत उल्लेखनीय वाढ झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन नवीन काही करण्याची आपणास प्रेरणा होईल. काही समस्यांमुळे नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मनात नोकरीत बदल करण्याचे विचार येऊ लागतील. व्यापारीवर्गास चांगला फायदा होईल. विशेषतः सल्लागार, लोखंडाचे व्यापारी व माध्यमांशी संबंधित व्यक्तींना खास लाभ होऊन त्यांच्या व्यापारास गती येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय होईल. आपल्या जोडीदाराची प्रगती होईल. त्यामुळे आपणास मनापासून आनंद होईल. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा चांगला आहे.