धनु साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील

    धनु (Sagittarius):

    लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने या आठवड्याचा काळ शुभ आहे असे गणेशजी सांगतात. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. त्यात यशही मिळेल. कीर्ती वाढेल. या आठवड्यात जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे सहकार्य चांगले मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नात्यातील मुली/ मुलासोबत विवाह करण्याचे योग जुळून येतील.