वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ ; आपणास शासना कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे

    वृश्चिक (Scorpio) :

    हा आठवडा आपल्यासाठी चांगला असला तरी आपणास नंतर कोणताही त्रास होऊ नये म्हणून विनाकारण खर्च करण्या पासून आपण दूर राहावे. प्राप्ती सामान्यच राहणार असल्याने कोणतेही मोठे आर्थिक जोखीम घेऊ नये. आपण जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा त्यास प्रतिकूल असल्याने सध्या तो लांबणीवर टाकावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबीय आपल्या आनंदासाठी एखादे मोठे काम करू शकतील. व्यापारात मोठा लाभ संभवतो. नोकरी करणाऱ्या जातकांची सुद्धा कामगिरी उत्तम होईल. आपणास शासना कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्यातील अति आत्मविश्वास आपणास घातक ठरू शकतो, तेव्हा काळजी घ्यावी. आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. आपण धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल.