वृश्चिक साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; मित्र आणि स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल

    वृश्चिक (Scorpio) :

    या आठवड्यात धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र आणि स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. बहीण- भावांच्या प्रेमाचा वर्षाव आपणांवर होईल असे गणेशजी सांगतात.