कन्या साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; प्रसाधनांवर स्त्री वर्गाचा खर्च होईल

    कन्या (Virgo) :

    या आठवड्यात मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय घ्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. दुपारनंतर मात्र जास्त संवेदनशील बनाल. मानसिक तणाव राहील. प्रसाधनांवर स्त्री वर्गाचा खर्च होईल. घर, जमीन, वाहन इ. चा सौदा जपून करा. ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने विद्यार्थ्यांना चांगला काळ. चालू आठवड्यात ज्वेलरी व्यवसायात जबरदस्त लाभ होईल. अडलेले पैसेही कर्जदार परत करतील.