हाइपरटेन्शन म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

उच्च रक्तदाब वाढलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा अधिक काम करण्याची आवश्यकता असते.

  जगभरात सगळीकडे १७ मे ला जागतिक हाइपरटेन्शन डे साजरा केला जातो.हाइपरटेन्शनला उच्च रक्तदाब असे बोलले जाते. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. उच्च रक्तदाब वाढलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा अधिक काम करण्याची आवश्यकता असते. सामान्यता रक्तदाब हा १२०/८० असा असतो. पण वाढल्यानंतर १४०/९० पेक्षा जास्त वाढत जातो. यामुळे हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया हाइपरटेन्शनची लक्षणे आणि उपाय.

  हायपर टेन्शनची कारणे:

  बदलत चालेल्या जीवशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. तणावपूर्ण आयुष्य जगत असताना अनेक समस्या जाणवतात. अशावेळी अनेक लोक मानसिक तणावामध्ये जातात. उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस (तणाव) किंवा योग्य वेळी न जेवणे. याव्यतिरिक्त उच्च रक्त दाबाची अनेक करणं आहेत. अति मानसिक ताण,आनुवंशिकता, आहारात फास्ट फूडचा समावेश, जास्त प्रमाणात मीठ खाणे, अवेळी झोपणे, वजन जास्त असणे इत्यादी कारणांमुळे उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.अतिप्रमाणात बाहेरील पदार्थांचे सेवन केल्याने हातापायांच्या लहानलहान रक्तवाहिन्यांच्या भिंतींलगत जमा होऊ लागतात. यामुळे रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब वाढू लागतो.

  हायपर टेन्शनची लक्षणे:

  • सतत डोकं दुखणे
  • चक्कर आल्यासारखं वाटणे
  • थकल्यासारखे वाटणे आणि सुस्ती येणे
  • हृदयाचे ठोके वाढणे
  • छातीत दुखणे
  • वेगवान श्वास घेणे किंवा श्वास घेण्यात त्रास होणे
  • नजर धुरकट होणे, यांसारखी लक्षणे उच्च रक्तदाब वाढल्यानंतर जाणवू लागतात.

  हायपर टेन्शनचे धोके:

  हायपर टेन्शन वाढल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. यामुळे मेंदूच्या नसा फुटण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या जाणवतात. उच्च रक्दाब वाढल्यानंतर चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, डोकेदुखी, दृष्टिदोष, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखं वाटणे, हातापायाला सूज येणे अशी लक्षणं दिसू लागतात.

  हायपर टेन्शनवर उपाय:

  • उच्च रक्तदाबाची समस्या जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेणे गरजेचे आहे, असे न केल्यास आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतील.
  • त्यामुळे नियमित व्यायाम करणे, योगासने, प्राणायाम करणे आवश्यक आहे.
  • आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
  • खसखस आणि टरबुजाच्या बियांचा गर वेग-वेगळा वाटून समप्रमाणात मिसळून सकाळी किंवा संध्याकाळी पिल्याने रक्तदाब कमी होतो.
  • मनुकांसोबत लसणाची पाकळी खाल्याने उच्च रक्तदाबावर आराम मिळतो.