56 व्या वर्षीही माधुरीची नितळ त्वचा काय आहे सिक्रेट, तुम्हीही वापरा या स्किन केअर टिप्स

माधुरीने आत्तापर्यंत अनेक हिंदी, मराठी आणि इतर भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ५६ व्या वर्षीसुद्धा माधुरीची त्वचा एवढी चमकदार आणि डागविरहित कशी काय? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना.

  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या उत्तम अभिनयामुळे आणि सौंदर्यासाठी सगळीकडे प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती वयाच्या ५६ व्या वर्षीसुद्धा फिट असल्याने सगळीकडे तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक केले जाते. तिची चमकदार आणि डाग विरहित त्वचा सगळ्यांचं आवडते. माधुरीने आत्तापर्यंत अनेक हिंदी, मराठी आणि इतर भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ५६ व्या वर्षीसुद्धा माधुरीची त्वचा एवढी चमकदार आणि डागविरहित कशी काय? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. ती नेमकं तिच्या त्वचेला काय लावते? तिच्या आहारात ती कोणत्या पदार्थांचे सेवन करते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिने सोशल मीडियावर दिली आहेत. चला तर जाणून घेऊया माधुरी दीक्षितच्या हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेचे रहस्य..

  भरपूर पाणी पिणे

  माधुरी दीक्षितने व्हिडिओ शेअर करत स्किन केअर रुटीन सांगितले आहे. त्यात ती म्हणाली, त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिल्यानंतर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात आणि त्वचा हेल्दी राहते. त्यामुळे दिवसातून कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्वचा हेल्दी आणि डाग विरहित राहील.

  तेलकट गोड पदार्थ खाऊ नये

  जास्त प्रमाणात तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नये. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर त्वचेचे आरोग्य बिघडते. यामुळे त्वचेवर डाग, पिंपल्स, एक्ने येऊन चेहऱ्याचा ग्लो कमी होतो.

  आहारात भाज्यांचा समावेश करा

  त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात योग्य त्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आहारात भाज्या, फळे, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन केले पाहिजे. जास्तीत जास्त फळांचा ज्यूस पिण्याऐवजी फळांचे सेवन केले पाहिजे. जास्त ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे फळे खाल्याने शरीराला फायबर्स मिळून त्वचा हेल्दी राहते.

  झोप

  त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी झोप घेणे फार महत्वाचे असे, असे माधुरी दीक्षितने सांगितले आहे. कमी वेळ झोपल्याने चिडचिड आणि त्वचेचा ग्लो कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी ७ ते ८ तास नक्की झोप घ्या.

  व्यायाम

  माधुरी दीक्षितच्या हेल्दी स्किनचे रहस्य म्हणजे व्यायाम करणे. नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते आणि त्वचेवर ग्लो येतो. ताणतणावपासून वाचण्यासाठी नियमित मेडीटेशन केले पाहिजे. रात्री झोपण्याआधी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.