टेलिव्हिजनला का पडले ‘इडियट बॉक्स’ हे नाव? भारतात कधी आले टीव्ही ? जाणून घ्या टेलिव्हिजनचा इतिहास

टीव्ही हि कल्पना उदयास येण्याचे कारण म्हणजे रेडिओ. टीव्ही चा शोध लागण्यापूर्वी रेडिओ चा शोध लागला होता आणि त्यावरून शास्त्रज्ञाना अशी कल्पना सुचली कि असे यंत्र तयार करावे, ज्याने ना केवळ ऐकावे तर चित्र देखील पाहता यावीत.

  आज जगभरात जागतिक टेलिव्हिजन दिवस साजरा केला जात आहे. टेलिव्हिजनला मराठी भाषेत दूरदर्शन म्हंटले जाते. समाजात दिवसागणिक टेलिव्हिजन पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मनोरंजन, शिक्षण, बातम्या आणि राजकारण इत्यादी अनेक विषयांबद्दल सर्व माहिती देणारे टेलिव्हिजन हे शिक्षण आणि करमणूक या दोन्हींचा एक उत्तम स्रोत आहे. काळ आणि तंत्रज्ञानानुसार टीव्ही मध्ये देखील अनेक बदल झाले. कधीकाळी ब्लॅक अँड व्हाईट चलचित्र दाखवणारे टीव्ही आता आवाज आणि द्रुश्यातील रंगसंगतीं स्पष्ट दाखवू लागले आहेत. तर एखाद्या डब्ब्याप्रमाणे दिसणारा हा टिव्ही आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे. घरातील सर्व सदस्यांच्या करमणुकीचं एक महत्वाच साधन बनलेल्या टेलिव्हिजनचा इतिहास आज जागतिक टेलिव्हिजन दिवसानिमित्त जाणून घेऊयात….

  टीव्हीचा शोध कोणी लावला ?

  टीव्ही चा शोध इ.स. १९३० च्या सुमारास जॉन लॉगी बेयर्ड ह्या शास्त्रज्ञाने लावला. मात्र टीव्ही ची कल्पना जॉन लॉगीं बेयर्ड ह्याच शास्त्रज्ञाची होती असे नाही , तर ह्यांचा शोध पूर्ण होण्याआधी पासून टीव्ही ची कल्पना उदयास आली होती आणि त्यावर प्रयत्न देखील सुरु होते. टीव्ही हि कल्पना उदयास येण्याचे कारण म्हणजे रेडिओ. टीव्ही चा शोध लागण्यापूर्वी रेडिओ चा शोध लागला होता आणि त्यावरून शास्त्रज्ञाना अशी कल्पना सुचली कि असे यंत्र तयार करावे, ज्याने ना केवळ ऐकावे तर चित्र देखील पाहता यावीत. जॉन लॉगीं बेयर्ड च्या आधी फिलो फॅरेन्सवर्थ नावाच्या शास्त्रज्ञाने टीव्ही तयार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला यश आले नाही, फिलो फॅरेन्सवर्थ ने टीव्ही तर तयार केला, परंतु त्यात केवळ चित्र पाहता येत होते पण आवाज येत नव्हता.

  भारतात कधी आले टीव्ही ?

  १९३४ मध्ये टीव्ही पूर्णपणे तयार झाला त्यानंतर, तब्बल १६ वर्षांनंतर म्हणजेच १९५० मध्ये भारतात (India) पहिल्यांदा टीव्ही पोहोचला. एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने प्रदर्शनात दूरदर्शन सादर केले होते. १५ सप्टेंबर १९५९ रोजी सरकारी प्रसारक म्हणून दूरदर्शनची स्थापना झाली. दूरदर्शनच्या सुरुवातीला काही काळ कार्यक्रम प्रसारित केले गेले आणि १९६५ मध्ये ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून नियमित दैनिक प्रसारण सुरू झाले.

  टीव्हीला का पडले ‘इडियट बॉक्स’ हे नाव?

  टेलिव्हिजनला अनेक जण इडियट बॉक्स म्हणूनही संबोधतात. याच कारण असं की टीव्ही हे लोकांचे मनोरंजन करते मात्र त्याच सोबत ते लोकांना अधिक काळ खिळवून ठेवते. अनेकदा टीव्हीवर काही कार्यक्रम पाहत असताना लोक वेळकाळ हरवून जातात. त्यामुळे अनेकदा लोकांचा सत्कार्णी लागणार वेळ हा केवळ टीव्ही पाहण्यात निघून जातो. तेव्हा अनेकदा बुद्धिमान लोक टेलिव्हिजनला इडियट बॉक्स म्हणून संबोधतात.

  टीव्ही चे प्रकार :

  1. ब्लॅक अँड व्हाईट [ Black & White TV ]

  2. डीएलपी टीव्ही [ DLP TV ]

  3. एलसीडी टीव्ही [ LCD TV ]

  4. एलइडी टीव्ही [ LED TV ]

   

  5. क्यूएलइडी टीव्ही [ QLED TV ]