बाजरीची भाकरी का खावी? जाणून घ्या

     

    बहुतेकदा  ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाताना दिसायची. आजी पिठात पाणी घालून कणीक मळायची, मग हाताने परातीत भाकरी थापायची आणि चुलीवर भाजायची. गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ आरोग्याला अधिक हितकारक. भारताने 2018 हे ‘बाजरीचं वर्ष’ म्हणून साजरं केलं आणि 2023 हे ‘जागतिक बाजरी वर्ष’ म्हणून साजरं करावं, असा भारत सरकारने दिलेला प्रस्ताव मार्च महिन्यात संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारला.

    “बाजरीला कमी पाणी लागतं आणि अतिशय उष्ण वातावरणातही तिचं पीक घेता येतं. बाजरी अतिशय चिवट पीक आहे आणि कीटकजन्य आजारांना तोंड देऊन ते टिकू शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते चांगलं आहे. ते पोषक असल्यामुळे आपल्यासाठीही ते चांगलं आहे. बाजरीमुळे मधुमेह कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते, कॅल्शियम वाढतं, शरीरातील जस्त व लोह यांची उणीव भरून निघते, असं अभ्यासांमधून समोर आलं आहे. तसंच बाजरीत ग्लूटेन नसतं.”

    बाजरीच्या कूकी, काप, पफ आणि इतर रुचकर पदार्थ सुपरमार्केटमध्ये व ऑनलाइन दुकानांमध्ये विकले जात आहेत. सरकार रेशन व्यवस्थेद्वारे लाखो लोकांना प्रति किलो एक रुपया दराने बाजरी पुरवते आहे. काही राज्य सरकारं शालेय माध्यान्ह आहार योजनेअंतर्गत बाजरीचे तयार अन्नपदार्थ देत आहेत. आयुष्यभर त्या ज्वारी-बाजरीचा वापर जेवणात करत आल्या आहेत. या साध्या धान्यात अचानक लोकांना का रुची वाटू लागली आहे.