अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण

अक्षय्य तृतीया सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व लाभले आहे. यादिवशी घरामध्ये नवीन वस्तू, गृहप्रवेश,लग्न, पूजा,शांती यांसारखे अनेक कार्यक्रम केले जातात.

  साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) भारतीय पंचागामध्ये विशेष महत्व आहे. हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहचला आहे. यंदाच्या वर्षी १० मे ला (शुक्रवारी) अक्षय्य तृतीया सण साजरा केला जाणार आहे.अक्षय्य तृतीया सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व लाभले आहे. यादिवशी घरामध्ये नवीन वस्तू, गृहप्रवेश,लग्न, पूजा,शांती यांसारखे अनेक कार्यक्रम केले जातात.

  अक्षय्य तृतीया हा दिवस शुभ दिवस म्हणून मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुग आणि सतयुग या युगांची सुरुवात होते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला युगादी तिथी असे देखील बोलले जाते. या सणाला मोठ्या प्रमाणावर सोनं चांदीची (Gold Silver) खरेदी केली जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का अक्षय्य तृतीयेलाच का सोनं चांदी खरेदी करतात? सोनं चांदी खरेदी करणं का शुभ मानलं जात? चला तर जाणून घेऊया या मागचे कारण.

  अक्षय्य तृतीयेच्या कथा काय?

  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्व दिले जाते. तसेच भगवान विष्णूची पूजा करून विष्णूला तांदूळ अर्पण केले जातात. यामुळे आयुष्यात अनेक लाभदायक फायदे होतात. या दिवशी सोनं चांदी खरेदी करून भगवान कुबेरांची पूजा केली जाते. यामुळे कुटुंबात सुख समाधान लाभून घरामध्ये ऐश्वर्य नांदते, असे मानले जाते. त्यामुळे दरवर्षी अक्षय्य तृतीयेला लोक सोनं चांदीची खरेदी करतात. या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे इत्यादी पदार्थांचे दान दिले पाहिजे.

  अक्षय्य तृतीयेला सोनं चांदी का खरेदी करतात?

  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्याने घरामध्ये ऐश्वर्य नांदते. या दिवशी सोनं खरेदी करणं हे अतिशय शुभ आहे. धार्मिक कथेच्या सांगण्यानुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या सन्मानासाठी सोनं, चांदी, मौल्यवान वस्तू, घर, नवीन मशीन यांसारख्या वस्तू खरेदी केल्या जातात. तसेच लोकांचा असा विश्वास आहे की, या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्याने गुंतवणुकीचे मूल्य वाढते, कधीच संपत्तीचा नाश होत नाही. खरेदी केलेल्या वस्तू कायम आपल्यासोबत राहतात. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोनं चांदी खरेदी केली जाते.