उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना तेल लावणे का गरजेचे आहे? जाणून घ्या सविस्तर

उन्हातून बाहेर फिरून आल्यानंतर केस कोरडे आणि चिकट होऊन जातात. केस चिकट झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू लावतो. मात्र केसांचा चिकटपणा जात नाही.

  सध्या सगळीकडे कडक उन्हाळा (Summer) सुरु आहे. तापमानात वाढ झाल्यानंतर आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. विशेषतः केस आणि त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवतात.उन्हातून बाहेर फिरून आल्यानंतर केस कोरडे आणि चिकट होऊन जातात. केस चिकट झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू लावतो. मात्र केसांचा चिकटपणा जात नाही. सतत केस चिकट होतात म्हणून अनेकजण केसांना तेल लावून मसाज करणं टाळतात. कारण केसांना तेल लावल्यानंतर केसातील चिकपणा वाढतो असे अनेकांचे मत आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना तेल लावणे गरजेचे आहे का? तेल न लावता केस निरोगी राहू शकतात का? असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील ना. चला तर जाणून घेऊया याची उत्तरे.

  उन्हाळ्यामध्ये केसांना तेल लावणे गरजेचे आहे का?

  उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर जाऊन आल्यावर केस कोरडे, चिकट आणि निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात केसांना तेल लावणे गरजेचे आहे. जर तुमचे केस आणि टाळू कोरडी असेल तर तुम्ही केसांना तेल लावून मसाज करू शकता. केस निर्जीव आणि निस्तेज झाले असतील तर केसांना तेल लावणे आवश्यक आहे. पण जर तुमचे केस आधीच तेलकट असतील तर तुम्ही तेल लावणे टाळू शकता. तसेच ज्यांना स्कॅल्पसंबंधित समस्या असतील अशांनी केसांना तेल लावणे टाळावे.

  केसांना तेल लावण्याचे फायदे:

  • उन्हाळ्यात केसांना तेल लावल्याने केसातील आर्द्रता टिकून राहते. धुळीच्या संपर्कामुळे केसांमधील आर्द्रता कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर जाताना तेल लावणे गरजेचे आहे.
  • केसांना रात्री तेल लावून मालिश केल्यानंतर सकाळी केस स्वच्छ धुतल्याने केस मऊ आणि चमकदार दिसू लागतात.
  • तेलाने मालिश केल्यानंतर केसांना पोषण मिळते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
  • तेल लावून केस मसाज केल्यानंतर केस गळती कमी होते.

  उन्हाळ्यात केसांना तेल लावताना कोणती काळजी घ्यावी?

  • जर तुमच्या केसामध्ये कोंडा किंवा तुमच्या टाळूला खाज येत असेल तर केसांना तेल लावू नये. यामुळे कोंडा वाढून केस चिकट होतात.
  • शॅम्पू करण्यापूर्वी दोन तास आधी केसांना तेल लावून ठेवावे. यामुळे केसातील आर्द्रता टिकून राहते आणि केस अधिक मऊ, सुंदर दिसू लागतात.
  • रात्रभर किंवा दिवसभर केसांना कधीही तेल लावून ठेवू नये. यामुळे स्कॅल्प अधिक तेलकट होतात.
  • तुम्ही तुमच्या स्कॅल्पनुसार तेल निवडले पाहिजे. तेलामुळे केसांना पोषण मिळते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवावे गरजेचे आहे. यामुळे तुमची टाळू स्वच्छ राहून केस निरोगी राहतात.
  • केसांना तेल लावताना जलद किंवा जास्त वेळ मसाज करू नका. यामुळे केसांची मुळे कमकुवत होण्याची शक्यता असते. तुमचे जास्तीचे केस तुटू शकतात.