गरम पदार्थांमध्ये लिंबू किंवा लिंबूचा रस का टाकू नये? जाणून घ्या…

    लिंबू हा भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. वजन कमी करण्यापासून ते जेवणाची चव वाढवण्यापर्यंत लिंबूचा वापर केला जातो. लिंबूचा वापर केल्याशिवाय सलाड आणि चाटमध्ये चव येते नाही. लिंबूमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तोंडाची चव वाढवण्याचं काम लिंबू करत असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई असते. आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, लिंबूचा रस गरम वस्तूंवर पिळून नये. गरम अन्न किंवा गरम पेयांमध्ये लिंबाचा रस घालणे आरोग्यासाठी चांगले नाही.

     

    एखादा पदार्थ शिजवताना त्याला चविष्ट बनण्यासाठी लिंबाचा रस टाकतो. लिंबू टाकल्याने त्याची चव वाढते यात शंका नाही. मात्र या लिंबूमुळे म्हणजेच गरम अन्नामध्ये व्हिटॅमिन सी टाकल्याने व्हिटॅमिन सीचा पौष्टिकता कमी होते. व्हिटॅमिन सी उष्णतेसाठी अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे काही इतर आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन सी मधील पोषक घटक उष्णतेच्या संपर्कात आल्याने पातळ होण्याचे कारण म्हणजे व्हिटॅमिन सीमध्ये एस्कॉर्बिक ऍसिड असते. उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यावर ते जलद खराब होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो.