Mid adult couple expecting a baby while husband caresses the belly of his pregnant african woman. Happy father hands on expecting mother's baby bump while embracing her on couch. Lovely indian man touching belly of his girlfriend and feeling baby movement.
Mid adult couple expecting a baby while husband caresses the belly of his pregnant african woman. Happy father hands on expecting mother's baby bump while embracing her on couch. Lovely indian man touching belly of his girlfriend and feeling baby movement.

  लग्नानंतर पतिपत्नी आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतात. अशावेळी पत्नीला गर्भधारणा झाल्यास जसे स्त्रियांच्या शरीरात (women body) बदल होत जातो तसाच त्यांच्यात मानसिक बदल घडत जातो, त्याचप्रमाणे पुरुषांच्याही मानसिक अवस्थेत बदल होत असतो. अशावेळी बऱ्याचदा पतीपत्नीच्या नात्यामध्ये असंतुलन येऊ शकते. अशा परिस्थितीत दोघेही समजूतदारपणे वागले तर ठीक, नाहीतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.

  गर्भधारणेच्या (pregnant)दरम्यान स्त्रियांना (women s-e-x) शारीरिक संबंधांमध्ये रुची नसते पण पुरुषांच्या मानसिक भावनेकडे पाहता त्यांना शारीरिक संबंध हवे असतात. या काळात दोघांनाही एकमेकांची गरज असते. म्हणून दोघांनीही नुसते शरीरानेच नव्हे तर मनानेही एकमेकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  गर्भावस्थेत (pregnant) शारीरिक संबंध (s-e-x) ठेवावेत की ठेवू नयेत या मूळ मुद्द्यावर येण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची काटेकोरपणे काळजी घ्यावी लागेल. गर्भावस्था हा काळ जसा एका महिलेसाठी (women) महत्त्वाचा आणि आयुष्यात (life) बदल घडवून आणणारा असतो तसाच तो पुरुषासाठीही (men) असतोच. या दिवसांत दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज असते. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ एकमेकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  तुमच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणारा एक दुवा तुमच्यात येणार असतो यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते?  तुम्ही आई बाबा (mom-dad) होणार असल्याचे समजताच पतीपत्नी म्हणून शरीराने दूर होत जाता. बहुतेक जोडप्यांना या दिवसांतही शारीरिक संबंध (s-e-x) ठेवावेसे वाटतात. पण त्यासाठी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.

  गर्भावस्थेतील पाहिले तीन महिने (first 3 month) आणि शेवटचे तीन महिने (end 3 month) या दिवसांमध्ये अजिबात शारीरिक संबंध ठेऊ नये. जर तुमचे आधी मिस्कॅरेज झाले असेल आणि तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर चुकूनही या दिवसांत शारीरिक संबंध ठेवू नका. तसेच पाहिले तीन महिने हे गर्भवती महिलांसाठी महत्त्वाचे असतात.

  या दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल चेंजेस होत असतात. अशावेळी त्यांना थकवा, मळमळ किंवा उलटी (Fatigue, nausea or vomiting) यांसारख्या समस्या होत असतात. या दिवसांत महिलांना शारीरिक संबंध ठेवण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यांच्या मनाची अवस्था त्यांच्या पार्टनरने समजून घेतली पाहिजे व त्यासाठी किंवा वेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांना अजिबात फोर्स करू नये.