हृदयात वाजे समथिंग समथिंग : PHOTO सर्वाधिक हृदयविकाराचा झटका सोमवारीच होतो , हृदयविकार हा शब्द नसून एक रोग आहे; हृदयाशी संबंधित अशा १० गोष्टी जाणून घ्या

आज जागतिक हृदय दिन #WorldHeartDay2021 आहे. यानिमित्त जाणून घ्या, हृदयाशी संबंधित अशा १० मनोरंजक गोष्टी ज्या फार कमी लोकांना ठाऊक आहेत.

  हृदयाशी संबंधित १० मनोरंजक गोष्टी

  अमेरिकन हार्ट असोसिएशनचे संशोधन (American Heart Association Research) म्हणते की, हृदयविकाराची सर्वाधिक प्रकरणे सोमवारी (Monday) घडतात. हिवाळ्यातील (Winter Season) हृदयविकाराच्या झटक्याचा हंगाम नाताळपासून (christmas) सुरू होतो. एवढेच नाही तर स्त्रियांचे हृदय (Female heart) पुरुषांपेक्षा जास्त काम करते, कारण त्यांच्या हार्टबीट्स जास्त (More Heartbeats) असतात.

  आज जागतिक हृदय दिन #WorldHeartDay2021 आहे. यानिमित्त जाणून घ्या, हृदयाशी संबंधित अशा १० मनोरंजक गोष्टी ज्या फार कमी लोकांना ठाऊक आहेत.

  महिलांच्या हृदयाच्या हार्टबीट्सचे प्रमाण अधिक असते.

  पुरुषांपेक्षा महिलांच्या हार्टबीट्सचे प्रमाण अधिक असते.
  महिलांचा हार्टबीट रेट सरासरी ७८ बीट प्रतिमिनिट असतो.
  पुरुषांचा हार्टबीट रेट सरासरी ७० बीट प्रतिमिनिट असतो.

  हृदयविकार खेळ नाही तर आजार आहे

  असं अनेकदा म्हटलं जातं की, दिल टूट गया. खरोखर हा एक रोग आहे.
  तणाव आणि नैराश्यात जगणाऱ्या लोकांमध्येच हा अधिक आढळून येतो.
  याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम असं म्हणतात, यात हृदयाचा एक भाग कमकुवत होतो.

  अर्ध्या किलोहूनही कमी आहे मानवी हृदयाचं वजन

  मानवी हृदयाचं वजन अवघं ४५० ग्रॅम आहे.
  महिलांच्या तुलनेत पुरुषांचं हृदय अधिक वजनदार असतं.

  सर्वात छोटं हृदय

  सर्वात छोटं हृदय ‘फेयर फ्लाय’ नावाच्या माशीचं आहे.
  या माशीचं हृदय एवढं छोटं आहे की, ते मायक्रोस्कोपच्या सहाय्यानेच पाहता येतं.

  सर्वात मोठं-सर्वात वजनदार हृदय

  जगात सर्वात मोठं आणि वजनदार हृदय ब्लू व्हेलचं आहे. याच्या हृदयाचं वजन १८० किलो आहे. मानवापेक्षा ६४० पट वजनदार

  पहिली ओपन हार्ट सर्जरी

  पहिली यशस्वी ओपन हार्ट सर्जरी अमेरिकेत ९ जुलै १८९३ रोजी झाली. ही सर्जरी अमेरिकन कार्डिओलॉजिस्ट डॅनियल विल्यम्स यांनी केली. बिना एक्स-रे आणि प्रतिजैविकांशिय डॉनियल यांनी सर्जरी केली.

  पहिला पेसमेकर ट्रान्सप्लांट

  जगातील पहिला पेसमेकर ट्रान्सप्लांट १९५८ मध्ये स्वीडननधील ४३ वर्षीय आर्ने लार्सन येथे करण्यात आलं.
  ट्रान्सप्लांट केल्यानंतर ते ४३ वर्ष जगले आणि २००१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला पण कारण हृदय विकाराशी संबंधित नव्हतं.
  पेसमेकर इम्प्लांट रुग्णांच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचे कार्य करतो, त्याची गती मंदावण्याला प्रतिबंध करतो.

  तुम्ही हसाल तर हृदयही हसेल

  हृदयला निरोगी ठेवायचं असेल तर हसणं आवश्यक आहे.
  यामुळे तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्तीही चांगली होते