World Thalassemia Day 2024 | काय आहे नक्की थॅलेसिमिया आजार, कशी झाली सुरूवात, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

थॅलेसेमिया हा रक्ततातील गंभीर आजार आहे. हा आजार झालेल्या रुग्णाला सतत रक्ताची आवश्यकता भासते. अनुवांशिक आजार असल्याने पालकांकडून मुलांना हे आजार होण्याची शक्यता असते.

  जगभरात ८ मे ला जागतिक थॅलेसिमिया दिवस साजरा केला जातो. हा एक रक्ता संदर्भातील गंभीर आजार आहे.थॅलेसिमिया झाल्यानंतर शरीरातील हिमोग्लोबिनची निर्मिती पूर्णपणे थांबून जाते. त्या व्यक्तीला सतत रक्त चढवण्याची आवश्यकता भासते. हा आजार अनुवांशिक असल्याने पालकांकडून मुलांमध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ८ मे ला आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन सगळीकडे साजरा केला जातो.

  थॅलेसेमिया दिनाचा इतिहास

  जगभरात जागतिक थॅलेसिमिया दिवस 1994 साली थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशने साजरा करण्यास सुरुवात केली. थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक जॉर्ग एंग्लेजॉस यांनी थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्ण आणि त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली होती. मात्र अजूनही जगभरातील सर्वच देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. थॅलेसेमिया आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, हे मूळ उद्दिष्ट आहे.

  थॅलेसेमिया म्हणजे काय?

  थॅलेसेमिया हा रक्ततातील गंभीर आजार आहे. हा आजार झालेल्या रुग्णाला सतत रक्ताची आवश्यकता भासते. अनुवांशिक आजार असल्याने पालकांकडून मुलांना हे आजार होण्याची शक्यता असते. थॅलेसेमिया आजाराची लक्षणे जन्म झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये दिसू लागतात. लाल रक्तपेशींची झपाट्याने घट होऊ लागते. शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य सुमारे 120 दिवसांचे असते. परंतु, थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाच्या शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य हे केवळ २० दिवसांचे असल्याने त्यांना सतत रक्ताची आवश्यता असते. अशा रुगणांना २० ते २५ दिवसांनी रक्त बाहेरून आणावे लागते. या आजारावर योग्य वेळी उपाय न केल्यास मृत्यू होऊ शकतो. तसेच वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं.

  थॅलेसेमिया आजाराची लक्षणे:

  • सतत अशक्तपणा जाणवणे.
  • थकल्यासारखे वाटणे.
  • ओटीपोटीत सूज येणे.
  • गडद लघवीला होणे.
  • त्वचेवर पिवळसर रंग येणे.नख, डोळे आणि जीभ फिकट होणे.
  • मुलांची वाढ मंदावणे.ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.

  थॅलेसेमिया उपचार:

  थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना वारंवार रक्त द्यावे लागते. या आजाराच्या रुग्णांना ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हा एकमेव उपचार आहे. मात्र हा उपाय २० ते ३० टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनरद्वारे मिळू शकतो. पण ७० टक्के रुग्णांना रक्तगटाच्या अभावी उपचार घेणे अवघड होऊन जाते. त्यांना सतत बाहेरून रक्त आणून चढवावे लागते.

  जागतिक थॅलेसेमिया दिन 2024 थीम:

  थॅलेसेमिया असलेल्या सर्व व्यक्तींना, त्यांचे स्थान किंवा आर्थिक परिस्थिती काहीही असो, अचूक निदान, वर्तमान आणि भविष्यातील उपचार आणि चांगली काळजी घेणे हे सुनिश्चित करणे.